esakal | नाशिक जिल्ह्यात १ लाख मतदार दुबार; दुरुस्तीसाठी शिवसेनेचे निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

Voter List

नाशिक जिल्ह्यातील मतदार यादीत एक लाख दुबार नावे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये १ लाख २२ हजार दुबार मतदार आहेत. मतदार यादीतील या त्रुटींचा परिणाम महापालिका निवडणूक, विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे सक्षम अधिकारी प्राधिकृत करून दुबार नावे रद्द करावीत, अशी मागणी जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली.

शिवसेनेने निवडणूक पूर्व तयारीचा भाग म्हणून मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्रूटी लक्षात आणून दिली. जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघात १ लाख २२ हजार २४२ दुबार मतदारांची नावे असल्याचे शिवसेनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताना याद्याच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्या. दुबार नावांमुळे आगामी महापालिका निवडणुकीवर याचा परिणाम होईल. बोगस मतदानामुळे दुसराच निवडणूक जिंकतो, असा आरोपही शिवसेनेने केला. निवडणूक आयोगाची ही फसवणूक होते. याकरिता प्रशासनाने सक्षम अधिकारी प्राधिकृत करून दुबार नोंदविलेली नावे रद्द करावीत, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे, विनायक पांडे, वसंत गिते यांनी केली.

हेही वाचा: नाशिक : भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर समर्थकांचा जल्लोष

सर्वाधिक बोगस नावे ‘मध्य’मध्ये

नाशिक मध्य मतदारसंघाची व्याप्ती मोठी असून, मतदारसंघात सुमारे ३ लाख १८ हजार ५७० मतदार आहेत. परंतु, नांदगाव, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, दिंडोरी, नाशिक पूर्व या मतदारसंघातील नावे मध्य मतदारसंघात नोंदविण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. इगतपुरी, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील नावे नाशिक पश्चिम मतदारसंघात नोंदविली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले

दुबार मतदारांची संख्या

नांदगाव (१२११७)

मालेगाव (४५०७),

मालेगाव बाह्य (११७१६),

सिन्नर (८३९८),

बागलाण (१२३५४),

निफाड (९८८३),

दिंडोरी (८६२४),

नाशिक पूर्व(१२३५७),

नाशिक मध्य (१२३४७)

इगतपुरी (५३५३).

हेही वाचा: हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून; हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

loading image
go to top