esakal | नाशिकमध्ये हॉटेल कामगाराची दगडाने ठेचून हत्या; भयंकर प्रकार सीसीटीव्हीत कैद
sakal

बोलून बातमी शोधा

 hotel worker was stoned to death in nashik incident captured in cctv rak94

हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून; हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : बालाजी कोट येथे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनिल गायधनी या कामगाराच्या डोक्यात दगड टाकून गुरुवारी मध्यरात्री उशीरा खूनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पहाटे यातील संशयिताला अटक केली आहे. खूनाचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. शहरातील सराफ बाजार ते दहीपूल परिसरात हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


बालाजी कोट परिसरात गुरुवारी मध्यरात्री सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीदरम्यान बालाजी कोट मंदिर परिसरातून जात असताना रक्तबंबाळ मृतावस्थेत त्यांना एक पुरुष आढळला. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कदम तत्काळ घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. अवघ्या काही मिनिटांत सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पंचवटीचे डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह गुन्हे शाखांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली अशा तीनही पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनी तत्काळ या खुनामागील संशयितांच्या शोधासाठी तपासचक्रे फिरवून शहर व परिसरात शोध घेतांना हॉटेल राजहंसमधील कामगाराचा मृतदेह असल्याची माहिती समोर आल्यानंतर हॉटेलमालक रमेश निकम यांना बोलावून घेत, मृतदेहाची ओळख पटविली असता अनिल गायधनी (५०) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले.


पहाटे दीड ते दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अनिल गायधनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीयाच भागातील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने येथील एका हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली होती.आज पहाटेच्या सुमारास रामसेतू पूल परिसरातील राजहंस हॉटेलमध्ये कामगाराचा हा मृतदेह असल्याचे उघडकीस आले. भागातील दुकानांचे फुटेज मिळवित एकाला ताब्यात घेतले.

हेही वाचा: नाशिक : भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर समर्थकांचा जल्लोष

संशयीत पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, दोन तासांत पोलिसांनी या खून प्रकरणात संशयित शुभम महेश मोरे (२२, रा. सराफबाजार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचे काही साथीदारदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत शुभम मोरे याला ताब्यात घेतले. खूनाचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता, पोलिस कोठडी देण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक हेल्मेट सक्ती : विनाहेल्मेट चालकांचे होणार फक्त प्रबोधन

loading image
go to top