Nashik : द्वारका ते मुंबई नाका मार्गावर वाहने घसरून अपघात

The Wadala Naka to Mumbai Naka route has been disrupted due to the leak of the flyover
The Wadala Naka to Mumbai Naka route has been disrupted due to the leak of the flyoveresakal

जुने नाशिक : द्वारका ते मुंबई नाका, द्वारका ते कन्नमवार पूल उड्डाणपुलास ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. पुलावरील पाणी खालील रस्त्यांवर पडून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात घडण्याचे प्रकार घडत आहे. (Accident on Dwarka Mumbai Naka Road due to rain Nashik latest marathi news)

द्वारका ते मुंबई नाका मार्ग घसरगुंडी झाल्याने अतिशय धोकादायक झाला आहे. वाहने विशेषतः दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहे. दिवसभरात काही वेळ जरी जोरदार पाऊस झाला की, वडाळा नाका ते मुंबई नाका मार्गावर बॅरिकेटिंग लावून रस्ता बंद करावा लागतो. या मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडने वळविली जाते.

त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. सर्व्हिस रोडवरून पायी चालणाऱ्या नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उड्डाणपुलास जागोजागी गळती लागल्याने ते पाणी पुलाखालील रस्त्यांवर पडून वाहनांमुळे रस्त्यावर असलेली माती आणि उड्डाणपुलाचे पाणी रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये पडून दुभाजकामधील माती रस्त्यावर येऊन मोठा चिखल होत आहे.

The Wadala Naka to Mumbai Naka route has been disrupted due to the leak of the flyover
चांदी लुटीचा पोलिसांना लागेना सुगावा; तांत्रिक माहितीचा घेतला जातोय आधार

त्यावर वाहने घसरण्याचे प्रकार दैनंदिन घडत आहे. दैनंदिन दिवसातून अनेक वेळा वडाळा नाका ते मुंबई नाका मार्ग बंद करावा लागतो. काही वेळात रस्ता वाळला, की त्यानंतर पुन्हा मार्ग सुरू करण्यात येत असते. दिवसातून अनेक वेळा अशा प्रकारचा खेळ सुरू असतो.

अनेक जणांचा अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना देखील गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर घडल्या आहे. उड्डाणपुलाची गळती थांबवणे आवश्यक आहे. शिवाय दुभाजकांची उंची वाढवून त्यातील माती रस्त्यावर येणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशी मागणी नागरिकांसह वाहनधारक करत आहे.

The Wadala Naka to Mumbai Naka route has been disrupted due to the leak of the flyover
Dhule Crime : डंपरची 8 चाके काढून चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com