Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळ यांचे वक्तव्य म्हणजे 2 समाजांत तेढ निर्माण करणारे; सकल मराठा समाजाचा आरोप

नगर येथे काल ओबीसी समाजाचा मेळावा झाला. त्यात मंत्री भुजबळ यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली आहे.
Accusation entire Maratha community Minister Bhujbal statement is rift between two societies nashik news
Accusation entire Maratha community Minister Bhujbal statement is rift between two societies nashik newsesakal

वणी : नगर येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या बाबतीत बोलतांना दोन समाजात तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप दिंडोरी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला असून, त्याचा निषेध व्यक्त करीत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वणी पोलिसांत निवेदन करुन करण्यात आली आहे. (Accusation entire Maratha community Minister Bhujbal statement is rift between two societies nashik news)

नगर येथे काल ओबीसी समाजाचा मेळावा झाला. त्यात मंत्री भुजबळ यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली आहे. या भाषणात केलेल्या चुकीच्या वक्तव्याने वणी परिसरातील मराठा समाज बांधव एकत्रीत येत, वणी पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी निवेदन देण्यात आले.

संविधानीक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी भुमिका यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. आशयाचे निवेदन वणी पोलीस ठाण्याचे पो. उप. निरीक्षक विजयकुमार कोठावळे यांच्या कडे देण्यात आले.

Accusation entire Maratha community Minister Bhujbal statement is rift between two societies nashik news
Chhagan Bhujbal : ''हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्या'', छगन भुजबळांचं जरांगेंना थेट चॅलेंज

यावेळी वरीष्ठांकडे याबाबत कळवून त्यांच्या आदेश व परवानगीने कारवाई करु असे पोलिस उपनिरीक्षक कोठावळे यांनी उपस्थितांना सांगितले. दरम्यान उद्या दुपार पर्यंत भुजबळांवर गुन्हा दाखल केला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे वणी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, आखिल भारतीय मराठा महासंघाचे बाळासाहेब घडवजे, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, गणेश देशमुख, ॲड.विलास निरघुडे, सचिन कड, संपतराव कड, बापू महाले, राजेंद्र महाले, भास्कर पाटील, प्रविण कड, विशाल देशमुख, सचिन पवार, विजय भवर, शुभम खांडे, राहूल मोरे, अशोक पाटील व मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Accusation entire Maratha community Minister Bhujbal statement is rift between two societies nashik news
Chhagan Bhujbal : गायकवाड शिकले, तेथे मी सीनिअर प्रोफेसर; छगन भुजबळ यांचा टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com