Nashik Crime News : अंबडमध्ये 52 तडीपार, सातपूरला 1300 टवाळखोरांवरांवर कारवाई

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

सातपूर (जि. नाशिक) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच पोलिसांनी कडक पावले उचलले असून, चोरीच्या घटना रोखण्यासाठी सातपूर, अंबडला स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज तैनात केल्याची माहिती मार्गदर्शन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आयमाच्या बैठकीत मार्गदर्शन केले. (Action against 52 Tadipar in Ambad and 1300 criminals in Satpur Nashik Latest Crime News)

Nashik Crime News
Fake Police Fraud : पोलिस असल्याची बतावणी करून गंडविणाऱ्यास अटक

सदर बैठक पोलिस आयुक्त नाईकनवरे व आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयमा कार्यालयात झाली. या वेळी पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख, आयमाचे उपाध्यक्ष संदीप पानसरे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बूब, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, आयमा तक्रार समितीचे चेअरमन विनायक मोरे आदींसह व्यासपीठावर उपस्थित होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले, की अंबडमध्ये ५२ गुन्हेगारांवर तडीपार, तर सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की सातपूरमध्ये सुमारे १३०० टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. काही राजकीय नेते व कार्यकर्तेही रडारवर असलेल्यांचे ही संकेत दिले.

Nashik Crime News
Fake Service Continuity Letter Fraud : शिक्षिकेकडून शालेय संस्थेची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com