Fake Service Continuity Letter Fraud : शिक्षिकेकडून शालेय संस्थेची फसवणूक

Fake Documents News
Fake Documents Newsesakal

जुने नाशिक : शिक्षिकेकडून तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची बनावट सही असलेले सेवा सातत्यपत्र शालेय संस्थेत जमा करून संस्थेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of school organization by female teacher making Fake Service Continuity Letter Nashik Latest Crime News)

Fake Documents News
Nashik Crime News : 11 लाखांचा मद्यसाठा जप्त; जायखेडा पोलिसांची कारवाई

सीबीएस येथील वायडी बिटको शैक्षणिक संस्थेत कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका सुनीता शिवाजी आहेर (रा. कामटवाडा, सिडको) यांनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या बनावट सहीने त्यांच्या वेतनश्रेणी आणि सेवा सातत्याचे बनावट पत्र तयार केले. ते पत्र संस्थेत सादर करून सेवेचा लाभ घेत होते. मुख्याध्यापिका सुनंदा वाघ यांच्या लक्षात आले.

शिक्षिकेने सादर केलेल्या पत्रास सुमारे एक वर्ष उलटूनदेखील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून संस्थेस त्यांचे पत्र प्राप्त झाले नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी संस्थेचे विश्वस्त प्रकाश वैशंपायन यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या निदर्शनात प्रकार आणून दिला. त्यांनी श्री. उपासनी यांच्याशी संपर्क करून पत्राची शहानिशा केली. पत्रावर असलेली सही त्यांची नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा वाघ यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि श्री. उपासनी यांच्याशी पत्रव्यवहार करून सदर पत्राबाबत खात्री केली. सही आणि पत्र दोन्ही बनावट असल्याचे सिद्ध झाले. सध्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सौ. वाघ यांना कारवाई करत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सौ. वाघ यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित शिक्षिका सुनीता आहेर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Fake Documents News
Fake Police Fraud : पोलिस असल्याची बतावणी करून गंडविणाऱ्यास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com