esakal |  VIDEO : भाजप नेत्याला 'हॅप्पी बर्थडे' पडला महागात! IGP दिघावकरांनी दिले कारवाईचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

bjp birthday.jpg

पोलीस आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली देत व ऐन कोरोनाच्या संकट काळात शासकीय नियम धाब्यावर बसवत भाजपा प्रदेश व शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपच्या एका महिला शहर पदाधिकारींच्या "पती देवां" च्या वाढदिवसाचा कार्यक्रम सिडकोत भर रस्त्यामध्ये साजरा करण्यात आल्याने नागरिकांत कमालीची आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

 VIDEO : भाजप नेत्याला 'हॅप्पी बर्थडे' पडला महागात! IGP दिघावकरांनी दिले कारवाईचे आदेश

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) :  ऐन कोरोनाच्या काळात भररस्त्यात धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महागात पडल्याचे  दिसत आहे. कारण नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदीप दिघावकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेमध्ये धावपळीचे चित्र आहे

Igp प्रदीप दिघावकर यांचे कारवाईचे आदेश

पोलीस आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली देत व ऐन कोरोनाच्या संकट काळात शासकीय नियम धाब्यावर बसवत भाजपा प्रदेश व शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपच्या एका महिला शहर पदाधिकारींच्या "पती देवां" च्या वाढदिवसाचा कार्यक्रम सिडकोत भर रस्त्यामध्ये साजरा करण्यात आल्याने नागरिकांत कमालीची आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता पोलीस प्रशासन याबाबत नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर "सकाळ"च्या वृत्ताची दखल घेत कारण नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदीप दिघावकर यांनी कारवाईचे आदेश दिले

संतापजनक प्रकार! सिडकोत भाजपा नेत्याचा वाढदिवस धुमधडाक्यात
कोरोनाचा संकट काळ अजूनही संपलेला नाही. प्रत्येकाने आपल्याबरोबर दुसऱ्याची काळजी घ्यावी. कोरोनापासून दोन हात दूर राहावे असा संदेश वारंवार मुख्यमंत्री, शासन-प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन देत आहे. अगदी बेंबीच्या देठापासून प्रत्येकाला हात जोडून कळकळीची विनंती करण्यात येत आहे. याकरिता आरोग्य विभाग वारंवार सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगत आहे. आजही कोरोना पूर्णपणे संपलेला नसून दररोज ही आकडेवारी २०० ते ३०० च्या दरम्यान बाहेर येत आहे. शासन-प्रशासन पोटतिडकीने सांगत असताना बोटावर मोजण्याइतके काही लोकप्रतिनिधी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा संतापजनक प्रकार सिडकोत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बघायला मिळाला.

नागरिकांमध्ये कमालीचे आश्चर्य

भाजप शहर महिला पदाधिकारी असलेल्या "पती देवां" चा वाढदिवस मोठ्या थाटामाटात राका चौकात साजरा करण्यात आला. याकरिता खास करून बॅनरबाजी, मंडप, स्टेज, साऊंड सिस्टिम या सर्वांची व्यवस्था करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर हा वाढदिवस सर्वांना दिसावा व गाजावाजा व्हावा याकरिता तो मुद्दामून भररस्त्यात घेण्यात आला होता. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्याची मोठी अडचण निर्माण होत होती. अंबड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न

भर रस्त्यात कार्यक्रम, मंडप व बॅनर ची परवानगी घेतली होती का ?
पन्नास जणांची संख्या, सामाजिक अंतर व मास्क नियम मोडला त्याचे काय?
वाहतुकीस अडथळा ठरेल अशा ठिकाणी कार्यक्रम घेणे योग्य आहे का ?
कोरोना च्या काळात भर रस्त्यात वाढदिवस साजरा करणे योग्य आहे का ?
आयोजक चुकले परंतु भाजपा प्रदेश व शहर पदाधिकारी यांना त्याबद्दल काहीच वाटले नाही का ?
याबाबत कोणाची काही एक हरकत नसेल तर मग कोरोना संपला असे म्हणायचे का ?
तर मग सर्वसामान्यांनी असे केले तर यापुढे चालेल का ?

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..