Nashik News: इलेक्‍ट्रॉनिक सिगारेटविरोधात महाविद्यालय प्रांगणात कारवाई

आवश्‍यक उपाययोजना राबविण्याच्‍या प्राचार्यांना सूचना
e-cigarettes
e-cigarettessakal

Nashik News : विद्यार्थ्यांना व्‍यसनाधीनतेपासून दूर ठेवताना शासनस्‍तरावर विविध उपाययोजना केल्‍या जाता आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इलेक्‍ट्रॉनिक सिगारेट्‌स वापराबाबत प्रतिबंध करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्‍या सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिल्‍या आहेत.

प्राचार्यांनी मोहीम राबविण्यासह अन्‍य उपाययोजना करण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. (Action against electronic cigarettes in college premises Nashik News)

इलेक्‍ट्रॉनिक सिगारेट्‌स प्रतिबंध अधिनियम २०१९ यानुसार इलेक्‍ट्रॉनिक सिगारेट्स आणि तत्‍सम उपकरणांच्‍या, पदार्थांच्‍या वापरावर राज्‍यात बंदी घातली आहे.

या अधिनियमातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याबाबत तसेच उपकरण, पदार्थांची शैक्षणिक संस्‍था व नजीकच्‍या परिसरामध्ये विक्री तसेच उपयोग केला जाणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याबाबत शिक्षण संचलनालयाने विद्यापीठांना कळविले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

e-cigarettes
Nashik Damage Road: ‘संकट हीच संधी’ मानण्याची परंपरा कायम; खड्ड्यांची रांगोळी बुजविण्यासाठी 104 कोटी

गेल्‍या १८ मेस परिपत्रक निर्गमित करताना आवश्‍यक सूचना केल्‍या होत्‍या. पुणे विद्यापीठाने दीड महिन्‍यानंतर महाविद्यालयांना पत्र पाठवत उपाययोजना करण्याचे सुचविले आहे.

या पत्रात नमूद केल्‍यानुसार इलेक्‍ट्रॉनिक सिगारेट्स पदार्थ महाविद्यालय, संस्‍था यांच्‍या परिसरात विक्री तसेच उपयोग केले जाणार नाही, यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्‍या. तसेच दक्षता घेण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यास सांगितले आहे.

e-cigarettes
Tribal Ashram School: नवीन वेळापत्रकानुसारच आश्रमशाळा सुरू राहणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com