नाशिक : संक्रातीला गच्चीवर DJ लावून धिंगाणा करणाऱ्या युवकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police action

संक्रातीला गच्चीवर DJ लावून धिंगाणा करणाऱ्या युवकांवर कारवाई

नाशिक : मकर संक्रांत (Makar Sankrant) हा वर्षाचा पहिला सण असल्याने प्रत्येकामध्ये एक वेगळा उत्साह सामावला आहे. सोबत पंतगोत्सव (Kite festival) देखील उत्साहात साजरा केला जात आहे. पण यावर्षीदेखील वर्षाच्या पहिल्याच सणावर पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) सावट असल्याने शहरात जमावबंदी रोखण्यासाठी 144 लागु करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना उत्सवाच्या आनंदाला मुकावे लागले आहे. पण यात काही महाभाग असेही आहेत जे कशालाही न जुमानता आपल्याच मस्तीत दंग आहेत.

शहरातील घनकर गल्ली परिसरात अनेकजण आपल्या घरांच्या छतांवर डिजे लावून सोबत कोरोना नियमावलीचे (Corona guidline) पालन न करता पतंग उडवत आहेत. या परिसरातील अशा एका घराच्या छतावर धिंगाणा करणाऱ्या तरूणांवर सरकारवाडा पोलिसांनी कारवाई केली असून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या या गोंधळाचा आणि डिजेच्या कर्कश आवाजाचा परिसरातील इतर नागरिकांना त्रास होत होता.

हेही वाचा: नाशिकच्या गोदातीरी भाविकांची गर्दी...पाहा PHOTOS

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top