NMC News : सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमणांवर लवकरच हातोडा; मनपा प्रशासनाकडून पाहणी

सारडा सर्कल ते दूध बाजारपर्यंत रस्त्यावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाकडून लवकरच हातोडा पडणार आहे.
Municipal officials staff inspecting from Sarada Circle to Bhadrakali Market and talking to businessmen.
Municipal officials staff inspecting from Sarada Circle to Bhadrakali Market and talking to businessmen.esakal

NMC News : सारडा सर्कल ते दूध बाजारपर्यंत रस्त्यावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाकडून लवकरच हातोडा पडणार आहे. लवकरच याठिकाणी मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. (action soon on encroachments in Sarda Circle area by nmc nashik news )

बुधवारी (ता.३) अतिक्रमण पथकासह अतिक्रमण, नगररचना विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून या मार्गावर पाहणी करत अतिक्रमणधारकांना अनधिकृत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या. सारडा सर्कल ते भद्रकाली मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलेले आहे.

काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून याविरुद्ध तक्रार करण्यात येऊन अतिक्रमण मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमण आणि व्यवसायाचे ठिकाण यातील मार्किंग यापूर्वी केली आहे.

Municipal officials staff inspecting from Sarada Circle to Bhadrakali Market and talking to businessmen.
NMC News : भाडेतत्त्वावरील मिळकतींचा महापालिका घेणार शोध; उत्पन्नवाढीसाठी टोकाची भूमिका

त्यानिमित्ताने महापालिका अतिक्रमण उपआयुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी राजाराम जाधव, योगेश रकटे, नगररचना विभागाचे शाखा अभियंता प्रदीप भामरे, श्री. जोपुळे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बोरसे, विविध कर विभागाचे अधीक्षक चंदन घुगे, लिपिक विनायक जाधव, पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागूल, जीवन ठाकरे, नीलेश काळे, सुमीत दिवे, सुनील कदम.

रमेश शिंदे, जावेद शेख, श्री.हमरे, श्री.तिडके बापू लांडगे, बापू गायधनी, मिलिंद ढोले तसेच पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत दुकानदार आणि टपरीधारकांना पक्के स्वरूपाचे बांधकाम येत्या आठ दिवसाच्या आत स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना केल्या.

अधिकारी कर्मचाऱ्यांकडून यावेळी येथील व्यावसायिकांशी चर्चा करण्यात आली. आठ दिवसानंतर कधीही अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले. अतिक्रमण मोहिमेच्या पाश्‌र्वभूमीवर व्यावसायिकांनी नाराजी आहे.

Municipal officials staff inspecting from Sarada Circle to Bhadrakali Market and talking to businessmen.
NMC News: कोरोना पार्श्‍वभूमीवर महापालिका सज्ज; आयुक्तांच्या बैठकीत सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com