esakal | नाट्यगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षा; लॉकडाउनमुळे नाटकांच्या तालमींवर परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

theater

नाट्यगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षा; लॉकडाउनमुळे नाटकांच्या तालमींवर परिणाम

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आगामी टप्प्यात नाट्यक्षेत्र खुली व्हावी, अशी अपेक्षा कलाकार, दिग्दर्शक व्यक्त करत आहेत. नाट्यगृहांचा पडदा लवकर उठावा आणि पहिल्यासारखे नाटकांचे प्रयोग व्हावेत, अशी आशा कलाकारांमध्ये आहे. दरम्यान, नाटकांच्या तालमींवरही याचा परिणाम झाला आहे. (actor and director are expecting the theater to open in the next phase of the lockdown)

सध्या सुरू असलेल्या नाटकाचे प्रयोग बंद आहेत. ते पुढील टप्प्यात सुरू होतील. परंतु नवीन नाटकाच्या कोणत्याच तालमी सध्या सुरू नाहीत. शहरात फेब्रुवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. शहरात दर महिन्याला नाटकांचे सुमारे पन्नासहून अधिक प्रयोग होतात. जानेवारीनंतर अनलॉक प्रक्रियेनंतर नाटकांचे प्रयोग ५० टक्‍के प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाले. नाटकांना अपेक्षित प्रतिसादही मिळत होता. आता बरेच निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे पुढच्या टप्प्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळणे गरजेचे आहे. लॉकडाउनमध्ये अनेकांनी नव्या नाटकांच्या प्रदर्शनाचे नियोजन करून नाटकांच्या लेखनाची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, अद्यापही नाटकांवर निर्बंध असल्याने निर्मितीप्रक्रिया रखडली आहे. लॉकडाउनमुळे नाटकांवर परिणाम झाला असून, आर्थिक नुकसानीबरोबरच आगामी प्रकल्पही रखडले आहेत. नाटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक तंत्रज्ञांनी अन्य व्यवसायांचा पर्याय निवडला आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात सर्वच भागात गर्दी, जागोजागी वाहतुकीची कोंडी

लॉकडाउनच्या नियमामुळे आणि ऑनलाइनवर नाटकाचे काम करणे न पटण्यासारखे आहे. कोणकोणती नाटकं-एकांकिका करावी ही प्रोसेस सुरू आहे. काही नवीन प्रोजेक्ट्सवर चर्चा, लिखाण, तालमीचे नियोजन सुरू आहे.

-विनोद राठोड, दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार

एकांकिकांचे प्रयोग रखडले असून, नाट्यगृह सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. मेमधील स्पर्धाही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे फटका बसला आहे. नाट्यगृह सुरू झाल्यावर कोरोना नियमावली कशी राहील, याबाबत संभ्रम आहे.

- आनंद जाधव, नाट्यसेवा

(actor and director are expecting the theater to open in the next phase of the lockdown)

हेही वाचा: नाशिकमधील सुंदरनारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम रखडले