esakal | नाशिकमधील सुंदरनारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम रखडले
sakal

बोलून बातमी शोधा

Sunder Narayan Temple

नाशिक व पंचवटी परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यात गोदातटावरील सुंदरनारायण मंदिराचाही समावेश होतो. केंद्राच्या निधीतून सुरू असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या बंदच असून, ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न भाविकांनी उपस्थित केला आहे.

नाशिकमधील सुंदरनारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम रखडले

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक व पंचवटी परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यात गोदातटावरील सुंदरनारायण मंदिराचाही समावेश होतो. केंद्राच्या निधीतून सुरू असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या बंदच असून, ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न भाविकांनी उपस्थित केला आहे. १७५६ च्या सुमारास सरदार गंगाधर चंद्रचूड यांनी दहा लाख रुपये खर्च करून हे मंदिर उभारले. उत्तम बांधणी व शिल्पकृतीमुळे हे मंदिर आपले वेगळेपण टिकवून आहे. (Renovation work of Sunder Narayan Temple in Nashik stalled)

काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिरासाठी चुना, शिशव, नवसागर आदींचा वापर करण्यात आला आहे. नाशिकचा धार्मिक व ऐतिहासिक ठेवा असलेल्या या मंदिराला धोका निर्माण झाल्याने केंद्र सरकारने पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी साडेबारा कोटींचा निधी मंजूर केला. जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले खरे, परंतु कोरोना किंवा अन्य कारणाने हे काम करणारे परराज्यातील कारागीर निघून गेल्यापासून हे काम ठप्पच आहे. या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु, या मंदिराला संरक्षित वास्तूचा दर्जा देण्यात आला आहे. मंदिरातील मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या असून, त्या ठिकाणी नित्यनेमाने पूजाअर्चा सुरू आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात सर्वच भागात गर्दी, जागोजागी वाहतुकीची कोंडी

हरिहर भेटीला आगळे महत्त्व

दर वर्षी वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट महोत्सव होतो. या वेळी कपालेश्‍वर मंदिराचे पुजारी मध्यरात्री सवाद्य येऊन कपालेश्‍वराचा बेलाचा हार सुंदरनारायणाला म्हणजे विष्णूला अर्पण करतात. तर सुंदरनारायणाचे पुजारी तुळशीचा हार घेऊन तो कपालेश्‍वर महादेवाला अर्पण करतात. हा हरिहर भेटीचा सोहळा कोरोनामुळे गेल्या वर्षापासून झालेला नाही.

लवकरच काम सुरू : आळे

मंदिराचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पुजारी यांनी व्यक्त केली. दुसरीकडे हे काम ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे, त्या पुराणवस्तू संशोधन विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती आळे यांनी कोरोनामुळे परराज्यात गेलेले कारागीर परतल्यावर काम त्वरित सुरू करण्याचा विश्‍वास व्यक्त केला. मंदिरासाठी आवश्‍यक दगड घडविण्यात आले आहेत; परंतु मंदिराच्या एका बाजूच्या कामाला तेथील व्यावसायिकाने हरकत घेतल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

(Renovation work of Sunder Narayan Temple in Nashik stalled)

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नेट मॅन'! बघण्यासाठी गर्दी