Ganesh Visarjan 2021 : मालेगावात गणेश विसर्जनासाठी चोख बंदोबस्त

Police
Police Sakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात गणेश विसर्जनासाठी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकाचौकांत सशस्त्र पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्वसंध्येला शनिवारी (ता. १८) शहर पोलिस दलाने सायंकाळी सशस्त्र संचलन केले. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी नेतृत्व केले.


पोलिस नियंत्रण कक्ष आवारातून संचलनास सुरवात झाली. शिवाजी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संगमेश्‍वर, रामसेतू पूल, शिवशक्ती चौक, राम मंदिर, तांबा काटा, शास्त्री चौक, मुल्लाबाडा मशिद, पेरी चौक, मोहम्मद अली रोड, सरदार चौकमार्गे नियंत्रण कक्ष आवारात सांगता झाली. शहरवासीयांनी गणेश विसर्जन शांततेत व महापालिकेने उभारलेल्या तात्पुरत्या गणेश कुंडांमध्ये करावे. विसर्जनासाठी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले. दरम्यान, महापालिकेने विसर्जनाची तयारी पूर्ण केली आहे. तात्पुरते गणेशकुंड उभारणी, परिसर स्वच्छता पूर्ण झाली आहे. कायमस्वरूपी दोन व तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या १३ गणेशकुंडांवर महापालिकेने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मसगा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विविध संस्था, सामाजिक संघटना टेहेरे चौफुलीवर मूर्तीदान स्वीकारणार आहेत. गणेशभक्तांनी नदीपात्रात विसर्जन टाळून मूर्तीदान कराव्यात, असे आवाहन स्वयंसेवकांनी केले आहे. दरम्यान, विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तीर्थप्रसाद, महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले.

Police
नाशिक : पोलिस शिपायाच्या अंत्ययात्रेत आयुक्तांनी दिला खांदा



शहरातील बंदोबस्त असा :
उपअधीक्षक - ३
पोलिस निरीक्षक - १३
सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक - ३२
पोलिस कर्मचारी - २३५
महिला पोलिस- १६
गृहरक्षक दलाचे जवान - १६६
एसआरपी सेक्शन - १४
आरसीपी प्लटून - २

Police
डेंगीने मोडले सुखी संसाराचे स्वप्न! नवविवाहितेच्या मृत्यूने हळहळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com