tribal employees
sakal
नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत खासगी कंपनीमार्फत (बाह्यस्रोत) कंत्राटी भरतीविरोधात तब्बल चार महिने अन् १८ दिवसांपासून सुरू असलेले बिऱ्हाड आंदोलन संपण्याची शक्यता आहे. आंदोलकांनी स्वतःहून आदिवासी आयुक्तांची मंगळवारी (ता. २५) भेट घेत बाह्यस्रोत भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. यासंदर्भात त्यांना लेखी आश्वासन हवे असून, आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके याविषयी सकारात्मक असल्याने बुधवारी (ता.२६) आंदोलक घरी परतण्याची शक्यता आहे.