नाशिक- आदिवासी विकास महामंडळातील पालघर येथील धान खरेदीत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्याकडे एकूण २८ कोटींची वसुली करण्याचे आदेशही त्यांनी दिले.