esakal | दोन रुपयांची लालूच मेडिकल दुकानदाराच्या अंगाशी! झाला ५ हजारांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा


medical Shop

दोन रुपयांची लालूच मेडिकल दुकानदाराच्या अंगाशी! झाला ५ हजारांचा दंड

sakal_logo
By
यूनुस शेख

जुने नाशिक : सध्या राज्यात कोरोना माहामारीने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णाचा आकडा दररोज नवे विक्रम मोडत आहे. या दरम्यान प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. दुकानात होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील आत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र अवघ्या २ रुपयांच्या नफ्यासाठी एका मेडीकल दुकानदारास ५ हजारांचा दंड भरण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे.

शहरात वीक एण्ड लॉकडाउनचे पालन होत आहे की नाही, याची पहाणी करण्यासाठी महापालिकेकडून पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पाहणी दरम्यान रविवारी (ता.१८) रात्री मेडिकल दुकानात औषधांसोबतच कोल्ड्रींक विकताना आढळून आले. पथकातील सदस्यांनी मेडिकल दुकानदाराची चौकशी केली. तर त्याने कोड्रींग विक्रीची कबूली दिली. कडक कारवाईस सामोरे जाता कामा नये, तसेच दुकानदारांची पहिलीच वेळ असल्याने पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यानी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत ५ हजारांचा दंड वसूल केला.

हेही वाचा: प्रश्न 54 टन ऑक्सिजन, 5 हजार रेमडेसिव्हिरचा!

दोन तासात २५ हजारांचा दंड

त्याचप्रमाणे रविवारी रात्री ७ पासून तर रात्री ९ वाजेपर्यंत दोन विविध प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या. नियमबाह्य आस्थापना सुरु ठेवल्या प्रकरणी प्रभाग १४ मधीलच एका हॉटेल चालकास १० हजारांचा दंड केला. तर प्रभाग २३ मध्ये लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन केल्याने एकास ५ हजारांचा दंड केला. तसेच नियमबाह्य आस्थापना सुरु ठेवल्याने दुकानदारावर दंडात्मक कारवाई करत ५ हजारांचा केला. दोन तासात असा सुमारे २५ हजारांचा दंड पथकांने वसुल केला. विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट नेतृत्वात गौतम पवार, नुपूर रसाळ, रवींद्र वाघमारे, रविकिरण जाधव प्रतिभा जयकर, अजय मोरे, सुभाष देशमुख, सागर बिरुटे, मोनिष केदारे, संतोष गायकवाड, बाळू भोई आदींचा कारवाईत सहभाग होता.

हेही वाचा: लग्नाचा बार उडाला पण संपूर्ण वऱ्हाडी मंडळी संकटात!