The unsanitary condition in the vegetable market area of ​​Shivaji Chowk.
The unsanitary condition in the vegetable market area of ​​Shivaji Chowk.esakal

Nashik News: सिन्नर नगरपरिषदेचा कारभार ‘रामभरोसे’! नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुख्याधिकाऱ्यांसोबतच अन्य अधिकारी व कर्मचारीही कार्यालयीन वेळेत भेटत नसल्याचे श्री. मुत्रक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सिन्नर : नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी कार्यालयात भेटत नसल्याने व मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक किरण मुत्रक यांनी केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांचा धाक नसल्याने शहरातील सार्वजनिक ठिकणांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्याधिकाऱ्यांसोबतच अन्य अधिकारी व कर्मचारीही कार्यालयीन वेळेत भेटत नसल्याचे श्री. मुत्रक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (administration of Sinnar Municipal Council on stake Citizens health at risk due to regular cleaning Nashik News)

सिन्नर नगरपरिषदेला स्वच्छतेबाबत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यांत मुख्याधिकाऱ्यांचे शहर स्वच्छता व कार्यालयीन कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक मुत्रक यांनी केली आहे.

नगरपरिषदेचा कारभार प्रशासकांकडे आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी मंडळ नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणाचाच धाक उरलेला नाही. मुख्याधिकारी आठवड्यात केवळ तीन दिवस कार्यालयात येतात.

दुपारी दोननंतर कार्यालयात ते येतात. त्यामुळे सकाळी विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांना व नागरिकांना त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी अधिकारी भेटत नाही. मुख्याधिकाऱ्यांकडून अनेकदा बैठकांसाठी नाशिकला जात असल्याचे कारण सांगितले जाते.

मुख्याधिकाऱ्यांनी सिन्नर शहरात मुख्यालयात राहणे अपेक्षित असताना, ते नाशिकहून ये-जा करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रान मोकळे असून, नगरपालिका प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

The unsanitary condition in the vegetable market area of ​​Shivaji Chowk.
Nashik Godavari Aarti : नाशिककरांना वेध गोदा महाआरतीचे

लोकांची कामे ठराविक वेळेत होणे अपेक्षित असताना, ती विलंबाने होतात. निर्णय होत नाही. पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष असल्याने सिन्नरकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

शहरातील मध्यवर्ती भागात कचरा व घाण साचली असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे, अशा विविध तक्रारींचा पाढा वाचत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामांच्या जबाबदारीचे वाटप होत नसल्याने सिन्नर नगरपरिषदेचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे श्री मुत्रक यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

"मी, माझे अधिकारी व सर्व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमित हजर असतात. प्रशासकीय कामे, कोर्ट केसेस किंवा नाशिक, मुंबईतील कामासाठी काही वेळा जावे लागते. प्रशासकपद निफाड प्रांताधिकाऱ्यांकडे असून, त्यांच्याकडेही कामानिमित्त जावे लागते. लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी दररोज कार्यालयात असतो. रात्री नऊपर्यंत काम करतो. त्यामुळे करण्यात अलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही." -रितेश बैरागी, मुख्याधिकारी, सिन्नर

The unsanitary condition in the vegetable market area of ​​Shivaji Chowk.
Nashik News: पिंपळगावमध्ये पसरतेय बँका, पतसंस्थाचे जाळे! बँका जाताहेत ग्राहकांच्या दारात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com