नाशिक- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज पावतीच्या आधारे प्रवेश घेतलेल्या; परंतु अद्यापपर्यंत प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेतलेल्या एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपूर्वी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा, अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.