Nashik Food Adulteration Crime: शहरात पनीरचा भेसळयुक्त साठा जप्त, 2 ठिकाणी छापे; ‘एफडीए’ची कारवाई

Stock of adulterated paneer seized and officials.
Stock of adulterated paneer seized and officials.esakal

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरूच आहे. सिडको परिसरामध्ये धडक मोहीम राबवत ८४ हजार ११० रुपये किमतीचे बनावट ३९७ किलो बनावट पनीर जप्त करून नष्ट करण्यात आले. याप्रकरणी दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला.

सणासुदीतील दिवसांच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम सुरूच आहे. लागोपाठ होत असलेल्या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (Adulterated Paneer stock seized in city nashik crime news)

सणासुदीच्या दिवसात दर्जेदार पदार्थ उपलब्ध व्हावेत, याचाच भाग म्हणून अन्न औषध प्रशासनाचे पथक सकाळी साडेसहापासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या आधारावर दुर्गा मंदिराच्या मागे, त्रिमूर्ती चौक, सिडको येथे विराज एन्टरप्राईजेसची तपासणी करून तेथून पनीरमध्ये खाद्यतेलाच्या भेसळीच्या संशयावरून पनीरचा नमुना घेऊन उर्वरित सुमारे ७४ किलो (किंमत १६ हजार २८०) साठा जप्त केला.

तसेच सिडकोतील उपेंद्रनगर येथील मे. साई एन्टरप्रायजेसची तपासणी करून तेथून सुमारे ३२३ किलो (किंमत ६७ हजार ८३०) पनीर साठा जप्त करण्यात आला असून, असा एकूण ८४ हजार ११० रुपये किलो किमतीचे ३९७ किलो पनीर जप्त करून नष्ट करण्यात आले.

Stock of adulterated paneer seized and officials.
Nashik Bribe Crime: 500 रुपयाची लाच स्विकारणे आले अंगलट! दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकासह तिघांना अटक

सदरचे दोन्ही पनीर नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही सहाय्यक आयुक्त मनीष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अविनाश दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Stock of adulterated paneer seized and officials.
Nashik Crime: मालेगावला मसाले उत्पादकावर छापा; लाखोचा मसाला, मिरची पावडर जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com