Gunaratna Sadavarte : अखंड भारताची मागणी करणारे नथुराम गोडसे देशद्रोही कसे? ॲड. सदावर्तेंचे विधान

Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarteesakal

Gunaratna Sadavarte : अखंड भारताच्या फाळणीला काँग्रेस कारणीभूत असून, महात्मा गांधी अन्‌ काँग्रेसमुळेच अखंड भारतातून पाकिस्तान वेगळा झाला. त्यामुळे अखंड भारताची मागणी करणारे नथुराम गोडसे देशद्रोही कसे ठरू शकतात, असे वादग्रस्त विधान ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी (ता.२२) येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारख्यांनी मिळून दिल्लीत शेतकरी आंदोलन केले, कष्टकरी शेतकऱ्यांसाठीच्या कायद्याला विरोध केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. (Adv gunaratna sadavarte statement about Nathuram Godse nashik news)

गंजमाळ येथील रोटरी सभागृहात ‘लढा विलिनीकरणाचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आला. ॲड. सदावर्ते म्हणाले, मी गांधींजींचे विचार मानत नाही.

त्यांच्याआधी बुद्धांनी शांती व अहिंसेचा संदेश जगाला दिला. त्यांच्यामुळे अखंड भारताची फाळणी झाली. अखंड भारताची मागणी नथुराम गोडसे यांनी केली होती, ती चुकीची नव्हती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gunaratna Sadavarte
Nathuram Godse : भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देश बनवायचाय; उपमुख्यमंत्र्यांचा घणाघाती हल्ला

त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे ते देशद्रोही ठरू शकत नाही. त्यांच्या अखंड भारतासाठी आमची चळवळ काम करीत राहील, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले.

ॲड. सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना, त्यांच्याच काळात दाऊत इब्राहिम उदयाला आला. त्यांच्यासारख्याच कॉर्पोरेट शेतकऱ्यांनी मिळून दिल्लीत आंदोलन केले. त्यामुळे देशभरातील कष्टकरी शेतकऱ्यांना हमी देणारा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणला होता तो लागू होऊ शकला नाही.

Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadawart यांनी सांगितले कोर्टात काय घडले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com