Uddhav Thackeray Group : अद्वय हिरे 27 जानेवारीला मुंबईत शिवसेना ठाकरे गटात सामील होणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Advay Hirey news

Uddhav Thackeray Group : अद्वय हिरे 27 जानेवारीला मुंबईत शिवसेना ठाकरे गटात सामील होणार!

मालेगाव (जि. नाशिक) : संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे, शिक्षण व सहकारमहर्षि कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या चौथ्या पिढीचे वारसदार, युवानेते अद्वय हिरे २७ जानेवारीला मुंबईत उध्दव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य तथा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नेते कार्यकर्ते आणि समविचारी मान्यवरांचा यावेळी पक्षात जाहिर प्रवेश सोहळा होईल. (Advay Hire will join Shiv Sena uddhav Thackeray group in Mumbai on January 27 Nashik Political News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती ३ फायदे आणि ३ तोटे

शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे सायंकाळी चारला पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री भास्कर जाधव, महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. हिरे व सहकाऱ्यांचा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.

सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असुन, मालेगांव व नाशिक येथील प्रवेश करणाऱ्या भाजपासह इतर पक्षाच्या कार्यकर्त्याची मुंबई येथे जाण्याची लगबग सुरु झाली आहे.

श्री. हिरे यांनी नाशिक येथे समविचारी समर्थक कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेत भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय जाहिर करुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: Maharashtra Politics : पुन्हा शिंदे फडणवीसांची दिल्ली वारी; शहां बरोबर खलबतं