Onion Crop : लासलगावला कांद्याचे लिलाव पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Red onion that came up for sale on Tuesday at the Agricultural Income Market Committee.

Onion Crop : लासलगावला कांद्याचे लिलाव पूर्ववत

लासलगाव (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २७) झालेल्या आंदोलनानंतर मंगळवारी (ता. २८) कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले असून, कांद्याच्या (Onion Crop) दरात किरकोळ पन्नास रुपयांची वाढ दिसून आली. (After agitation in Agricultural Produce Market Committee onion auction was restored nashik news)

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे कांदा भावासंदर्भात लिलाव बंद पाडले होते. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी लासलगावला चर्चा केली.

त्यानुसार शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा घडवून आणून देणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सोमवारी आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

मंगळवारी सकाळचेच्या सत्रात कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होऊन एक हजार ४४२ वाहनांतून २९ हजार ८३६ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कमीत कमी भाव तीनशे रुपये, तर जास्तीत जास्त भाव एक हजार २०१ रुपये, तर सरासरी भाव ६७५ रुपये होता. शनिवारच्या तुलनेत कांदा दरात सरासरी भावात ६२५ रुपयांवरून ६७५ रुपयांवर गेल्याने पन्नास रुपयांची किरकोळ वाढ दिसून आली.

टॅग्स :NashikFarmerOnion Crop