Nashik : दिवाळीच्या गोड- धोड फराळानंतर खवय्यांचा ‘मटण, चिकन’वर ताव!

Non Veg Plate
Non Veg Plateesakal
Updated on

मालेगाव शहर (जि. नाशिक) : अस्मानी संकटाच्या पावसाने उसंत दिली. तशाही परिस्थितीत बळीराजाने आपल्या भिजलेल्या पिकाची देखभाल करीत दिवाळीचा सण साजरा केला. कोरोनानंतरची ही दिवाळी जोरदार झाली. ऑनलाईन खरेदीच्या बडग्यात प्रत्यक्ष बाजारपेठांमधील गर्दी व रस्त्यांवरील दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात- आठ दिवसांपासून घराघरांत दिवाळीच्या फराळावर ताव मारला जात आहे. मात्र, यास विटलेल्या खवय्यांकडून मिठाईनंतर मटण, चिकनवर ताव मारला जात आहे. (After Diwali people crave for mutton chicken increased nashik Latest Marathi News)

दोन दिवसांच्या दिवाळीच्या सुटीत गावाकडे आलेले सर्वजण गोड जेवण, फराळाला कंटाळून तिखट मसालेदार चिकन, मासे, मटणच्या जेवणाला पसंती देत आहेत. अनेकांनी भाऊबीजेनंतर मळ्याखळ्यासह घराघरांत सामिष जेवणाची तयारी केली आहे. परिणामी चिकन, मासे, मटण अशा मांसाहारी पदार्थांना मागणी वाढू लागली आहे. दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र आल्याने शहरासह ग्रामीण भागातील विविध हॉटेल व ढाब्यांवरची गर्दी वाढत आहे. सुटीत प्रथमच मित्र गोतावळा एकत्र जमत आहे.

नात्यागोत्यांचीही गाव परिसरात गर्दी वाढली आहे. दिवाळीच्या फराळानंतर पाहुण्यांना सामिष भोजनाची जणू कसमादेत पद्धतच आहे. खास करून मटणाचेच बेत आखले जात आहेत. विशेषतः चुलीवरच्या मटणाचा स्वाद घेण्यास सर्वजण आतूर असतात. त्यातही मटणाचा खास खानदेशी मसाला वाटून- घाटून तर्रीदार भाजी बनविण्यासाठी कसमादे भागातील खवय्ये प्रसिद्ध आहेत. मटणासह चिकनला मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हिवाळ्यात विशेषतः चिकन, अंडी मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. त्यात दिवाळीनंतरच्या पाहुणचाराची जोड मिळाल्याने उलाढाल वाढली आहे.

Non Veg Plate
Bhaubij 2022 : आदिवासी विधवा महिलेच्या घरी खाकी वर्दीची भाऊबीज!

गोंधळ- दिवट्या बुधल्याची धूम

लग्नसराई लवकरच सुरू होत असल्याने लग्नानिमित्त गोंधळ, दिवट्या बुधल्या अशा कार्यक्रमांचीही रेलचेल वाढली आहे. चंदनपुरी, भाक्षी या ठिकाणी खंडेराव महाराजांच्या साक्षीने तर अनेक जण स्वतःच्या मळ्यात, घरी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करतात. एकीकडे लग्नापेक्षा ‘गोंधळ- दिवट्यां’च्या कार्यक्रमांचे आलेले निमंत्रण मात्र न टाळता मंडळी उपस्थित राहते.

मांसाहारी पदार्थांचे सर्वसाधारण दर

मटण - ६००

चिकन - १६०

गावरान - ६००

कॉकलर - ४००

मासे - ४००

बोंबिल - ५००

"शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणावर पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व कोंबडी पालन करतात. चाऱ्याचे भाव, शेळी चराई, कोंबडीच्या खाद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, त्या परिस्थितीत सध्या तरी बोकडचे दर स्थिर आहेत. जंगल व रान परिसरात शेळी चराई करतात. वन्यप्राणी व भटक्या कुत्र्यांची भीती असते. त्यामुळे काळजी घ्यावी लागते."

- संतोष पाटील, शेळी- कोंबडी पालक

"मटणाचा बाजार तेजीत येऊन मांसाहारी पदार्थांना मोठी मागणी असल्याने विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. तशीही मटणाचे दर नियमित असले तरी गेल्या वर्षभरातील मटणाचे दर कायम आहेत. महागलेल्या चाऱ्यामुळे बोकडाचे बाजारभाव वाढतात. पण, परंपरागत व्यवसाय असल्याने भाववाढ केलेली नाही. दिवाळीनंतर हिवाळ्यात मटण, चिकनला चांगली मागणी असते." - गुलाब शेख, मटण विक्रेते, मालेगाव

Non Veg Plate
Nashik : पतीच्या नावाने पैसे काढणे भोवले; जऊळकेच्या महिला सरपंच ठरल्या अपात्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com