esakal | Motivational Story : पंधरा शस्त्रक्रिया होऊनही जिद्दी शिक्षिकेने दिले कॅन्सरलाच आव्हान..!
sakal

बोलून बातमी शोधा

kaiser shaikh

पंधरा शस्त्रक्रिया होऊनही जिद्दी शिक्षिकेने दिले कॅन्सरलाच आव्हान..!

sakal_logo
By
विजयकुमार इंगळे

नाशिक : ‘जिसने जनम दिया, वह मुझे जिने भी देगा..!’ हे आव्हानात्मक उद्‌गार आहेत ३५ वर्षीय उच्चशिक्षित शिक्षिका युवती कैसर अनिस शेख यांचे. (after-fifteen-surgeries-teacher-challenged-cancer-nashik-marathi-news)

ज्याने पृथ्वीवर पाठवलं तो का मारणार?

शिक्षण बी.एस्सी., बी.एड. (मायक्रोबॉयलॉजी)... इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण... कैसर शेख मूळच्या जव्हारच्या... वडील अनिस इब्राहिम शेख, तर आई हुसेन... एकूण पाच भावंडे. वडील अनिस शेख हॉटेल व्यवसायातून संसाराचे रहाटगाडे ओढत असतानाच दीर्घ आजाराने ते अंथरुणाला खिळले. त्यानंतर मिळेल ते काम करत आईने संसाराचा गाडा पुढे नेला. कैसर बारावीत असतानाच आईनेही साथ सोडली. फारसा आर्थिक आधार नसल्याने त्यांनी बहिणीच्या मदतीने नाशिक गाठले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या कैसर यांना बालपणीच पोलिओमुळे पाय गमवावे लागले. त्यांच्या पायांवर तब्बल १३ शस्त्रक्रिया झाल्या. पण पाय निकामीच. येथूनच झाला आजारांच्या मालिकेचा श्रीगणेशा... २०१६ मध्ये कॅन्सरने डोके वर काढले... फक्त चार वर्षांचे आयुष्य शिल्लक, असे सांगण्यात आले... असे अंधकारमय चित्र डोळ्यापुढे असताना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मी चार वर्षे पार होऊन आज आनंदाने जगतेय. कसले मरण कसला यम, छे... ही वाक्य होती ती आत्मविश्‍वासू कैसर यांची.

''माझे आयुष्य असेच आनंदी आणि सुंदर जगणार''

कैसर यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना सांगितले, की आर्थिक परिस्थिती जेमतेम... स्वतःचा औषधांचा खर्च भागवणेही तसे जिकिरीचे झाले म्हणून शिकवणी वर्गासोबत ऑनलाइन बिझनेस सुरू केला. पण लॉकडाउनमुळे क्लासेस आणि ऑनलाइन व्यवसाय बंद झाला. औषधोपचारांचा खर्च, मेस, घरभाडे देणे अवघड झाले. मात्र न डगमगता रोजचा दिनक्रम सुरू ठेवला. दारात आलेल्या यमाला परतवून लावताना ही संकटे माझ्यासाठी खूप किरकोळ आहेत. ही संकटे माझ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. पुढील अनेक वर्षे मी माझे आयुष्य असेच आनंदी आणि सुंदर जगणार हे अतिआत्मविश्‍वासाने नव्हे अभिमानाने सांगते.

मनुष्यजन्म मिळालाय... त्याचे सोने करायचेय..! मला माझा मृत्यू आजच समोर दिसत असला तरी त्याची मला भीती नाही. माझ्या शिक्षणाचा समाजातील नव्या पिढीला उपयोग व्हावा... परिस्थिती कितीही बिकट असली तरी मार्ग हा निघतोच, हा सकारात्मक विचार सोबत ठेवून मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार. -कैसर शेख

हेही वाचा: 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

आजारांनाच दिले आव्हान...

कैसर शेख यांनी एका बाजूला भविष्य घडविणाऱ्या पिढीला दिशा देण्यासाठी कंबर कसली, तर दुसरीकडे आजारांची मालिकाच त्यांच्या आयुष्यात घट्ट विणली गेलीय. कैसरला गर्भाशयातील फिगो स्टेज २ बीचा निम्न ग्रेस एंडोमेट्रियल सारकोमा (Low grade endometrial sarcoma of uterus Figo stage2B) या आजाराने ग्रासले. सोबत अस्थमा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथून उपचार घेतायत. पायावर १३, तर कॅन्सरच्या दोन अशा १५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. स्वतः मायक्रोबायलॉजी पदवीधर असल्याने वैद्यकीय उपचारांसोबतच त्यांनी आयुर्वेदिक उपचारांचा शोध सुरू केला. त्यांच्या पोटात वाढणारा ट्यूमर दर वर्षाला काढावा लागतो, मात्र यासाठी येणारा खर्च पेलविणे शक्य होत नाहीये. त्यांना गरज आहे दानशूर हातांची...!

हेही वाचा: मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, फडणवीस यांना निवेदन

loading image