esakal | मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी; फडणवीस यांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, फडणवीस यांना निवेदन

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ


सिडको (जि. नाशिक) : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन छावा क्रांतिवीर सेना व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. (statement given to devendra fadnavis on behalf of Maratha community in Nashik)

समाजाच्या प्रलंबित प्रश्नांविषयी व परिस्थितीविषयी सखोल अभ्यास केलेला असल्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र एसईबीसी प्रवर्ग तयार करून विधिमंडळात कायदाही संमत करून घेतला होता. दुर्दैवाने हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवून मराठा समाज मागास नाही, यावर आपला निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे हा समाज पुन्हा पन्नास वर्षे मागे गेला आहे. यानंतर विविध मान्यवरांनी हा मुद्दा निकाली काढण्यासाठी विविध पर्याय सुचविले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे असेल आणि त्यासाठी या सूचित पर्यायांचा वापर करायचा असेल तर महाराष्ट्र विधानसभेचा प्रदीर्घ अनुभव, अभ्यासू राजकारणी आणि सक्षम विरोधी पक्षनेता, तसेच केंद्र सरकारमधील ज्येष्ठांचा विश्वासू म्हणून आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकता, असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिकला 59 वर्षांनी केंद्रामध्ये पहिल्यांदा मिळाले मंत्रिपद

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मुख्य समन्वयकाची भूमिका बजावून मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेली दरी साधण्यासाठी सेतू म्हणून काम करावे, असे साकडे या वेळी घालण्यात आले. राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली समाजासोबत झालेल्या बैठकीत २१ दिवसांत त्या पाच मागण्या पूर्ण करण्याविषयी आश्वासित केले आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांच्या अधिकारातील बार्गेनिंग पॉवर वापरून राज्य सरकारकडून आश्वासनाची पूर्तता करून घ्यावी, अशीही गळ सकल मराठा समाजातर्फे घालण्यात आली. या वेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, छावा क्रांतिवीर सेनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे, विजय खर्जुल, आशिष हिरे, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी, माधवी पाटील आदी उपस्थित होते.


(statement given to devendra fadnavis on behalf of Maratha community in Nashik)

हेही वाचा: नाशिकसाठी 50 इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - फडणवीस

loading image