esakal | जिल्‍ह्‍यात नऊ दिवसांनंतर बाधितांची संख्या तीनशेपार; मृतांच्‍या प्रमाणात पुन्‍हा वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus_careless_.jpg

जिल्‍ह्‍यात आतापर्यंत आढळलेल्‍या कोरोना बाधितांचा एकूण आकडा ९८ हजार ०७७ झाला असून, यापैकी ९३ हजार ८२७ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ७५५ रूग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. रूग्‍णालयात दाखल होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येतही वाढ झाली.

जिल्‍ह्‍यात नऊ दिवसांनंतर बाधितांची संख्या तीनशेपार; मृतांच्‍या प्रमाणात पुन्‍हा वाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या नऊ दिवसांनंतर तीशनेपार आढळून आली. तर दुसरीकडे गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूच्‍या प्रमाणातही वाढ झालेली आहे. गेल्‍या ११ नोव्‍हेंबरला दिवसभरात ३२५ बाधित आढळून आले होते, त्‍यानंतर शुक्रवारी (ता. २०) दिवसभरात ३०१ बाधित आढळले. कोरोनावर २२१ रूग्‍णांनी मात केली असून जिल्‍ह्‍यात आठ रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४९५ वर

सद्यस्‍थितीत जिल्‍ह्‍यात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४९५ झाली आहे. शुक्रवारी (ता. 20) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १६८, नाशिक ग्रामीण परीसरात ११८, मालेगावला अकरा तर जिल्‍हाबाह्य चार कोरोना बाधित आढळून आले. तर कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १७०, नाशिक ग्रामीणमधील ३९, मालेगावचे नऊ तर जिल्‍हाबाहेरील तीन रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍य मात केली आहे. आठ मृतांमध्ये नाशिक ग्रामीणमधील सहा, नाशिक शहरातील दोन रूग्‍णांचा समावेश आहे.

मृतांच्‍या प्रमाणात पुन्‍हा वाढ

सिन्नर तालुक्‍यातील लोणारवाडीतील ६५ वर्षीय महिला तर वडगाव येथील ५८ वर्षीय पुरूष, वणी (ता.दिंडोरी) तील ३३ वर्षीय पुरूष, नांदगावच्‍या ६३ वर्षीय, भगपुरच्‍या ६५ वर्षीय पुरूष रूग्‍णासह येवल्‍यातील ४९ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्‍यू झाला आहे. शहरात शरणपूररोडवरील ४७ वर्षीय महिला आणि जेलरोड येथील ६८ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. जिल्‍ह्‍यात आतापर्यंत आढळलेल्‍या कोरोना बाधितांचा एकूण आकडा ९८ हजार ०७७ झाला असून, यापैकी ९३ हजार ८२७ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ७५५ रूग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. रूग्‍णालयात दाखल होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येतही वाढ झाली.

हेही वाचा > संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल

मालेगावच्‍या १३० रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित

शुक्रवारी नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार २७६, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७१, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात तीन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच तर जिल्‍हा रूग्‍णालयात पाच रूग्‍ण दाखल झाले आहेत. प्रलंबित अहवालांच्‍या प्रमाणात पुन्‍हा एकदा लक्षणीय वाढ झाली असून, शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत तीन हजारहून अधिक अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील २ हजार २९३ रूग्‍णांचे अहवाल, नाशिक शहरातील ८९५ रूग्‍णांचे तर मालेगावच्‍या १३० रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते.

loading image
go to top