Onion Prices Fall : उन्हाळ पाठोपाठ लाल कांदाही गडगडला! लासलगावला मागणीपेक्षा पुरवठा अधिक

Lasalgaon market Committee
Lasalgaon market Committeeesakal
Updated on

लासलागाव (जि. नाशिक) : उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण बघावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. (After summer red onion price fall Lasalgaon has more supply than demand nashik news)

कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १ हजार ५०२ वाहनांतुन लाल कांद्याची आवक झाली. कमीतकमी चारशे रूपये, जास्तीतजास्त १ हजार ५७१ रूपये, तर सरासरी एक हजार २३० रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला.

मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने मोठ्या प्रमाणावर दरात घसरण होऊन कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. उन्हाळ कांद्यानंतर आता लाल कांद्याला दर नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यंदाचा कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अनेक भागात कांदा लागवडी अडचणीत आल्या. वाढलेला उत्पादन खर्च, मजूरटंचाई व कांदा काढणीपश्‍चात दरात झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे यंदा उत्पन्नाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Lasalgaon market Committee
Nashik News : RPFच्या कर्मचाऱ्याने वाचविला प्रवाशाचा जीव! घटना CCTV मध्ये कैद

येथील मुख्य बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक होत आहे. मात्र, तुलनेत मागणी घटल्याने कांदा कमी भावात कांदा विकावा लागत आहे. देशातून लाल कांद्याची निर्यात सध्या अफगाणिस्तान, आखाती देश व दुबईमार्गे पाकिस्तान येथे होत आहे.

मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम या देशांत मागणी तुलनेने कमी झाली आहे. देशांतर्गत गुजरातमधील महूवा, भावनगर, गोंडल भागात आवक अधिक आहे. त्यामुळे दर अपेक्षित नसल्याचे व्यापारी प्रतिनिधीकडून बोलले जात आहे.

Lasalgaon market Committee
Nashik News : काम जलद होण्यासाठी ‘चलो, सीएमओ कक्ष’! नाशिकमधून सर्वाधिक 1538 तक्रारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.