Nashik News : RPFच्या कर्मचाऱ्याने वाचविला प्रवाशाचा जीव! घटना CCTV मध्ये कैद

While saving the life of a passenger on platform two, Railway RPF employee K. K. Yadav.
While saving the life of a passenger on platform two, Railway RPF employee K. K. Yadav.esakal

नाशिक रोड : येथील स्थानकावर पवन एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर तिच्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा तोल गेला अन तो गाडी खाली जाण्याच्या आत तेथे उपस्थित आरपीएफच्या जवानाने त्याला खेचून बाहेर ओढत जीव वाचवला.

या घटनेत जवानांनी अतिशय वेगाने हालचाली केल्याने प्रवाशाचा जीव वाचला. याबद्दल जवान के. के. यादव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (RPF employee saved passenger life incident captured on CCTV Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

While saving the life of a passenger on platform two, Railway RPF employee K. K. Yadav.
Nashik News : महसूल कार्यालयाची वाट बिकटच

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. प्लॅटफॉर्म दोनवर पवन एक्सप्रेस थांबलेली असताना राममोहन प्रजापती (१८) हा युवक एक्सप्रेसमध्ये साहित्य चझवित होता, तेवढ्यात रेल्वे सुरू झाली. चढण्याच्या घाईगडबडीत त्याचा तोल गेला.

सामान उचलण्याच्या गडबडीत तो गाडीच्या दरवाजाजवळ पन्नास फुटापर्यत फरपटत गेला. त्याचवेळी तेथे तैनात कर्मचारी के. के. यादव यांनी धाव घेत त्याला गाडीपासून दूर ओढल्याने त्याचा जीव वाचला. यादव यांच्या प्रसंगावधानाबद्दल पोलिस निरीक्षक हरपूलसिंग यादव आणि जे. पी. राजपूत यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

While saving the life of a passenger on platform two, Railway RPF employee K. K. Yadav.
Nashik News : काम जलद होण्यासाठी ‘चलो, सीएमओ कक्ष’! नाशिकमधून सर्वाधिक 1538 तक्रारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com