Nashik News : काम जलद होण्यासाठी ‘चलो, सीएमओ कक्ष’! नाशिकमधून सर्वाधिक 1538 तक्रारी

Mantralay
Mantralayesakal

नाशिक रोड : कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, तसेच विविध शासकीय, निमशासकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री स्वयंसहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

नाशिक विभागात २० जानेवारी २०२० ला स्थापन झालेल्या या कक्षाचा लाभ नाशिक विभागात (उत्तर महाराष्ट्रात) नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वाधिक घेतला आहे.

आपले प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडण्यात नाशिक जिल्हा अव्वल ठरला आहे. विशेष म्हणजे, या कक्षाकडे केलेल्या तक्रारींचा जलदगतीने पाठपुरावा होऊन त्या सुटत असल्याने नागरिकांचा इकडे ओघ वाढला आहे. (people call to CMO office to speed up work Maximum 1538 complaints from Nashik News)

नाशिक विभागात जळगावातून ८१, धुळ्यातून ३८, तर नंदुरबारमधून केवळ दहा तक्रारी या कक्षाकडे करण्यात आल्या आहेत. आपले प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात मांडण्यासाठी सरकारने या कक्षाची प्रत्येक विभागात स्थापना केली आहे.

यात शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था स्तरावरील तक्रारींसह इतर तक्रारी नागरिकांनी नोंदविलेल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एक हजार ५३८, अहमदनगर १०७, जळगाव ८१, धुळे ३८, नंदुरबार दहा असे एकूण एक हजार ७७४ अर्ज नागरिकांनी केले असून, ८४ अर्ज प्रलंबित आहे.

Mantralay
NMC News : ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रश्नांची गतिमान सोडवणूक

आजपर्यंत दाखल झालेल्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने होत असल्याचा बहुतेकांचा अनुभव आहे. त्यामुळे या कक्षाकडे ओघ वाढत आहे. नागरिकांनी शासन संस्था किंवा निमशासकीय संस्थेविरुद्ध अर्ज केल्यानंतर महिनाभरात तक्रारींचे तथ्य तपासून कार्यवाही झाली आहे.

याचा फायदा अनेक लोकांना होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शिवाय कामे झाल्यानंतर सीएमओ कक्षाला नागरिक आभाराचे पत्रही पाठवतात.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Mantralay
Circus : कोरोनापूर्वी देशात होत्‍या 100 अन् आता उरल्‍या अवघ्या 5 सर्कस!

"तक्रारअर्ज प्राप्त झाल्यावर आम्ही तत्काळ कार्यवाही सुरू करतो. संबंधित संस्थेला पत्रव्यवहार करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासंबंधी आदेश करतो. सीएमओची प्रक्रिया गतिमान आहे. त्यामुळे याचा लाभ अनेक नागरिकांना मिळाला असून, लोकांनी आमच्या विभागाचे अभिनंदनही केले आहे." - कैलास निकम, नायब तहसीलदार, सीएमओ कक्ष

"घटनेने आपल्याला दिलेला अधिकार प्रत्येकाने वापरायला हवा. एखाद्या शासकीय कार्यालयातले काम होत नसेल व आपण सीएमओ कक्षात अर्ज केला तर कामाची गती वाढून काम नियमात असेल तर लवकर होते. हा एक न्यायदानाचा कक्ष आहे. शासकीय व निमशासकीय काम जलद गतीने होत असल्याचा अनुभव येतो आहे." - तुषार वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते

Mantralay
Nashik Crime News : अखेर रॉलेट गेमवर लाखो रुपये हरलेला सोमनाथ सापडला जालन्यात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com