Nashik News :...अन् अधिकार जातील, या भितीपोटी आक्रमक सरपंचांची थेट ZPवर धडक!

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal

नाशिक : जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर योजना हस्तांतरित करण्याचे गावाच्या सरपंचांचे अधिकार जैसे थे ठेवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतरही अधिकार जातील, या भितीपोटी नाशिक, त्र्यंबकेश्वर तालुक्यांसह जिल्ह्यातील सरपंच यांनी मंगळवारी (ता. २४) थेट जिल्हा परिषदेवर धडक मारली. (Aggressive sarpanchs headed directly on ZP for fear of loss of rights in jal jeevan mission scheme Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

ZP Nashik latest marathi news
JEE Mains Exam : रसायन, भौतिकशास्‍त्रच्‍या प्रश्‍नांनी फोडला घाम!

योजना हस्तातंरच्या आमच्या अधिकारावर गदा आणू नका, अशी आर्तहाक सरपंच यांनी दिली. मात्र त्यावर, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सरपंच यांचे अधिकार काढले नसल्याचे स्पष्ट करत, उपस्थितीत सरपंचांना जाब विचारला.JEE Mains Exam : रसायन, भौतिकशास्‍त्रच्‍या प्रश्‍नांनी फोडला घाम!

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करण्याचे सरपंचांचे अधिकार कायम असल्याचा खुलासा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांनी केला असताना काही सरपंचांनी अखिल भारती सरपंच परिषदेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत धाव घेतली. मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांची त्यांनी भेट घेतली.

अधिकार कोणास आहे हे महत्त्वाचे नाही मात्र, पाणी पुरवठा योजनेचे कामे गुणवत्तापूर्वक करून घेण्यासाठी पुढाकार सरपंच यांनी घेणे आवश्यक असल्याचे श्रीमती मित्तल यांनी सांगितले. यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, संदीप पवार, योगेश सूर्यवंशी, दत्तू ढगे, सुनील जाधव, अगस्ती फडोळ, भास्कर थोरात, संजय थेटे, शांताराम वलवे, समाधान बोडके, किरण कोरडे, राजू कौत्ये आदी सरपंच उपस्थित होते.

ZP Nashik latest marathi news
Muslim Marathi Sahitya Sammelan : नाशिकमध्ये 22 वर्षानंतर मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com