पैठणीचे शहर झाले खड्ड्यांचे शहर; श्राद्ध घालून होणार निषेध आंदोलन..वाचा सविस्तर

agitation against bad roads in the yeola city nashik marathi news
agitation against bad roads in the yeola city nashik marathi news

नाशिक/येवला : शहरातील रस्त्यांवरून फिरताना क्षणाक्षणाला मोठ्या खड्ड्यांची प्रचिती येतेच पण ठीकठिकाणी खड्डेच नव्हे तर रस्त्यात डबके तयार झालेआहे.यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे अशी वेळ आल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकवाड यांनी उद्या (ता.21 ) श्राद्ध घालून निषेध आंदोलन करणार आहेत.नवसहतीची अवस्था केविलवाणी झाली असून चिखलाने रस्ते माख्ल्याने पायी चालणे मुश्कील झाले आहे. 

शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता लोकप्रतिनिधी काय करतात असा प्रश्न नागरिक नगरपालिकेला विचारू लागले आहे.मागील काही वर्षांत छोट्या-मोठ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले.परंतु शहरातील कापड बाजारासह मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची खड्ड्यांसह त्यातील डबक्यांमुळे वाट लागली आहे. पालिकेसह नगरसेवकांचे उदासीन धोरण याला कारणीभूत ठरत असल्याने आता नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.यामुळे शिवसेनेचे राहुल लोणारी यांनी तर शांतता कमिटीच्या बैठकीत नगराध्यक्षावर बोचरी टीका करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले.आता अमोल गायकवाड व कार्यकर्ते पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मुंडण करून जबरेश्वर खुंटावर निषेध आंदोलन करणार आहे.त्यामुळे पालिकेने आता तरी जागे होण्याची वेळ आली आहे

कॉलनी भागाला वाली कोण...!
कॉलनी भागातील रस्त्यांची अक्षरशा दलदल झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी सध्याच्या पावसाळ्याच्या स्थितीत रस्ते नसलेल्या कॉलनी भागातून पायी चालून दाखवावे असे खुले चलेंज नागरिक देत आहे,इतकी वाईट स्थिती झाली आहे.निवडणुकीत कॉलनीवासियांना दिलेले आश्वासन तीन वर्ष उलटले तरी हवेतच विरले असून म्हसोबा नगर,बाजीराव नगर,पारेगाव रोड,मोरे वस्ती,विठ्ठल नगर,वेद कॉलनी आदी भागातील रस्ते अक्षरश चिखलात हरवले आहे.पाऊस पडताच रस्त्यात दलदल झाल्याने रहिवाश्याना घरात जाने - येणे झाले मुश्कील बनत आहे.

“शहर व कॉलनी भागातील रस्त्यांसह खड्ड्यांचा प्रश्न यापुर्वीचे व आत्ताचे सत्ताधारी मार्गी लावु शकले नाहीत.अनेकदा शिवसेनेने खड्ड्यात वृक्षारोपण,साचलेल्या पाण्याच्या डबक्यात कागदी होड्या सोडणे,खड्यांचा वाढदिवस,महाआरती आदी अभिनव अंदोलन करुनही सत्ताधाऱ्यांच्या संवेदना जाग्या होत नाही,ही शोकांतीका आहे.पालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून कामे होत नाही अन विरोधी पक्षही कमकुवत झालेला दिसतो.”
-राहुल लोणारी,शहर संघटक,शिवसेना

“रस्ते होणार या आश्वासनांवर वर्षानुवर्षे निघून चालले.आता रस्त्याची वाट लागली असून नागरिकांची हाल सुरु आहे. पालिकेचे दुर्लक्ष होत असून डबके साचले तरी लोकप्रतिनिधी उपाययोजना करत नसल्याने गोड बोलून वेळ मारून नेत असल्याने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ आली आहे.” 
-अमोल गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com