
नवरदेव शेतकरी पुत्राने गाडीवर चढविला बळीराजाचा साज
नरकोळ (जि. नाशिक) : विवाहानंतर वधुला सासरी आणण्यासाठीच्या वाहनावर बळीराजाचा साज (agricultural Decoration) करण्यात आल्याने जोरण (ता. बागलाण) येथील शेतकरीपुत्राचा विषय चर्चेचा ठरत आहे. शेतकऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा यानिमित्ताने नवरदेवाने (Groom) अधोरेखीत केला आहे.
शेतीमालाचे दिवसेंदिवस कोसळणारे भाव यामुळे शेती नवनवीन प्रयोग यशस्वी करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असून, विवाह समारंभात किती खर्च आला त्याला न डगमगता आपली इच्छा व अंकाक्षा मोठ्या जिद्दीने पूर्ण करतो. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा मात्र आजही ताठ मानेने अनेक संकटांना तोंड देत पुढे जातो. शेतकरी आपल्या शेतकरी पुत्राच्या विवाह समारंभासाठी लागणारा खर्चाला कधीही काटकसर करत नाही.
हेही वाचा: Nashik : दिंडोरी तालुक्यातील 2 विद्यार्थ्यांना कृत्रिम हात
पूर्वी नवरदेवाच्या गाड्यांना ‘दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, बंध रेशमाचे, माझी जीवनसाथी’ असे फलक दिसून येत. परंतु, आता बदलत्या काळानुसार शेतकरी नवरदेवाच्या सजवलेल्या गाडीवर मातीच्या किंवा फायबर बैलजोडी, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पुढे मोठ्या अक्षरात ‘मी शेतकरी’ यासह विविध फुलांनी सजवलेल्या गाड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या शेतकरी वराला वधू मिळणे कठीण असले तरी विवाह समारंभात हौसमौज मात्र तो जिद्दीनेच पूर्ण करतो.
हेही वाचा: जिल्हा बँकेचा चौकशी अहवाल सरकारला सादर करा; भुजबळ अन् भुसेंचे आदेश
"जीवनात शेतकऱ्यांची चढ- उतार ही राहणारच. विवाह हा आनंदाचा क्षण असून, यात हौसमौज झाली तरच आनंद मिळतो. या उद्देशाने मी शेतकऱ्यांची बैलजोडी, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गाडीच्या अग्रभागी ठेवत तिला फुलांनी सजविले."
- भूषण सावकार, वर, जोरण
Web Title: Agriculture Decoration On Grooms Car Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..