Nashik : दिंडोरी तालुक्यातील 2 विद्यार्थ्यांना कृत्रिम हात

rtificial prosthetic arm given to students
rtificial prosthetic arm given to studentsesakal

दिंडोरी (जि. नाशिक) : हौसला संस्था व जिल्हा परिषद (ZP) नाशिक यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शाळांत शिक्षण घेणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कृत्रिम प्रोस्थेटिक हात (Artificial prosthetic arm) बसविण्यात आले. त्यामुळे या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद गगनात मावेनासा झालानाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांच्या मार्गदर्शन खाली व दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या उपस्थितीत रोशन चौधरी व कीर्ती लोखंडे यांना कृत्रिम हात बसविण्यात आला. (Artificial Prosthetic hands to 2 students from Dindori taluka Nashik News)

हौसला संस्था दिव्यांग मुलांच्या शिक्षण पुनर्वसनासाठी शैक्षणिक मदत, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन कलागुणांना वाव देते, आरोग्य उपचार मदत, विविध कार्यशाळा घेत असते. तसेच समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साधने देऊन सर्वसामान्य जीवन व्यतीत करण्यासाठी मदत केली जाते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत संवेदनशील असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात.

rtificial prosthetic arm given to students
मातंग वाड्यातील घरांना आले गटारीचे स्वरूप

जिल्ह्यातील शाळेत जाणाऱ्या ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एक किंवा दोन हात नाही, अशा आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती समावेशीत शिक्षण विभाग समन्वयक, गटस्तरावरील विशेषतज्ज्ञ, विशेष शिक्षक यांच्यामार्फत संकलित करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या मदतीला हौसला संस्था धावून आली. या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे कृत्रिम हात मिळवून देण्यासाठी कॅडबरी सामाजिक संस्था, सोशल हार्डवेअर संस्था बंगलोर यांचे सहकार्य घेऊन मोजमाप शिबिर घेण्यात आले. मोजमापासाठी थ्रीडी स्कॅनर तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करण्यात आला.

rtificial prosthetic arm given to students
चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा अवघ्या 24 तासांत लावला शोध

दिंडोरी येथे झालेल्या शिबिरासाठी सोशल हार्डवेअर संस्थेचे संचालक अभित कुमार, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, जिल्हा समन्वयक सुरेखा पाबळकर, विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, विशेष शिक्षक गणेश सूर्यवंशी, पौर्णिमा दीक्षित, बिपिन भामरे, अश्विनी जाधव, प्रशांत बच्छाव, वैशाली तरवारे, श्रीकांत खलाने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com