Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajesakal

Nashik: कृषी विभागाच्या योजनांना शिवरायांचे नाव! मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानातील अडचणीही केल्या दूर

नामपूर : कृषी आयुक्तालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांपैकी काही योजनांना ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू लाभार्थ्यांना कोणत्याही प्रलोभनाशिवाय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Agriculture department schemes named shivaji maharaj Magel asked him to remove problems in subsidy of farm scheme Nashik)

कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्यावर तातडीने योजनांचा लाभ दिला जावा, अशी शासनाला अपेक्षा असली तरी याबाबत शेतकरी, कृषी अभ्यासक मात्र साशंक आहेत.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेची घोषणा राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पात केली. या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.

शेतकरी, कृषी क्षेत्रासाठी शिवरायांनी केलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षपूर्तीनिमित्त या योजनेला शिवरायांचे नाव देण्यात आले आहे.

२०२३/२४ या आर्थिक वर्षात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे, शेततळेचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (बीबीएफ) आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Dasara: येवल्यात विजयादशमीनिमित्त सामुदायिक सीमोल्लंघन! 350 वर्षांची परंपरेचे जतन, बालाजीच्या रथाचीही मिरवणूक

अशी आहे योजना...

पर्जन्याधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे घेऊन पाण्याची गरज भागविता येणार आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत शेततळ्यांचा समावेश २०२२ पासून केला आहे.

शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी योजनेचा एक भाग म्हणून मागेल त्याला शेततळे मिळेल. शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात येत असलेल्या अडचणी आता दूर झाल्या आहेत.

त्यामुळे मागील त्याला शेततळे ही संकल्पना वेगाने अमलात आणली जात आहे. यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक असून, क्षेत्रधारणास कमाल मर्यादा नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj
Railway News: दिवाळीनिमित्त रेल्वेतर्फे 36 उत्सव रेल्वेगाड्या! 2 विशेष मेमू रेल्वेही धावणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com