esakal | कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून सर्जा-राजाचे पूजन
sakal

बोलून बातमी शोधा

agriculture minister dada bhuse bail pola festival malegaon

कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून सर्जा-राजाचे पूजन

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव(जि. नाशिक) : शहर व परिसरात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. कृषिमंत्री दादा भुसे यांनी आपल्या निवासस्थानी सपत्नीक सर्जा-राजाचे पूजन करीत कृतज्ञता व्यक्त केली.

सर्जा-राजाला बांधावरील मुबलक हिरवे गवत खाण्यासाठी मिळाले. सकाळपासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. सकाळी बैलांना अंघोळ घालून सजविण्याचे काम सुरू होते. बैलांची शिंगे तासून त्यावर घुंगरू असलेल्या शाम्या लावणे, रंगरंगोटी याबरोबरच राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या काही गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांवर कोटी करणारी चित्र रेखाटली होती. अनेकांनी आपल्या नेत्यांची नावे व चित्र बैलांवर रंगवून जाणता राजा, दिलदार मनाचा मित्र, राज्याचा कैवारी यांसह विविध पक्षांची नावे देखील त्या-त्या कार्यकर्त्यांनी रेखाटली होती. तालुक्यातील पाटणे, सौंदाणे, दाभाडी, आघार, कळवाडी, निमगाव, वडनेर, करंजगव्हाण आदी गावांमध्ये उत्साह दिसून आला. पाटणे येथे विश्‍वनाथ खैरनार यांच्या मानाच्या बैलाची पूजा सरपंच राहुलाबाई अहिरे यांनी केली. नितीन सोनवणे यांच्या मानाच्या बैलाचे पूजन पोलिसपाटील रवींद्र खैरनार यांनी केले.

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

loading image
go to top