लासलगाव/निफाड- अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये को-पायलट दीपक बाळासाहेब पाठक (वय ३२) यांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. दीपक हे मूळचे निफाड तालुक्यातील नैताळे येथील असून, सध्या नोकरीनिमित्ताने बदलापूर येथे स्थायिक होते. मात्र, त्यांच्या आप्तस्वकीयांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.