नाशिक: आदिवासी विकास विभागाने कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेत सेवा पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिशेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासन सक्षम करण्याच्या उद्देशाने विजयभूमी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.