Industrial Expo
sakal
नाशिक: अंबड इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (आयमा) आयोजित ‘आयमा इंडेक्स-२०२५’ या औद्योगिक महाकुंभाचा सोमवारी (ता.१) उत्साहात समारोप झाला. त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्कर डोम येथे झालेल्या या चारदिवसीय प्रदर्शनात लाखांहून अधिक उद्योजक व नाशिककरांनी उपस्थिती लावली. या प्रदर्शनात नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात साधारणत: दीड हजार कोटींच्या आसपास करार करण्यात आले. तसेच, विविध स्टार्ट-अप्सनी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.