CHINA | विद्यापीठ कॅम्पस लॉक; अचानक 1500 विद्यार्थ्यांचे हॉटेलमध्ये स्थलांतरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china university

CHINA | विद्यापीठ कॅम्पस लॉक; 1500 विद्यार्थी हॉटेलमध्ये स्थलांतरित

चीन : डेलियनमधल्या झुआन्घे विद्यापीठात (Zhuanghe University) परिसरात एकाएक लावलेला लॉकडाऊन...आणि जवळपास १५०० विद्यार्थ्यांचे एकाएकी हॉटेलमध्ये करण्यात आलेले स्थलांतरण..या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे चीनमधील लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला आहे

एकाएक शेकडो विद्यार्थी स्थलांतरित

चीनच्या डेलियन (Dalian) शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. डेलियनमधल्या झुआन्घे विद्यापीठात (Zhuanghe University) अनेक कोविडचे रूग्ण सापडल्यानंतर, चीन सरकारने एकाएक शेकडो विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. विद्यापीठातील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहांमध्ये आणि हॉटेलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्याचे आदेश रविवारी दिले गेले. क्वारंटाईन मध्ये रहाणे, अनिवार्य कोविड चाचणी आणि प्रवास निर्बंध हा चीनी लोकांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. चीन देशाचा लसीकरण दर जगात सर्वात जास्त आहे आणि हिवाळ्यात बूस्टर डोसही दिला जाणार आहे. तरीही अशी परिस्थिती आहे. कोविडचा मागच्या महीन्यापासून अनेक शहरांमध्ये उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले गेले आहे.

हेही वाचा: ऐतिहासिक! भारतात समलैंगिक सौरभ कृपाल बनले न्यायाधीश

बुधवारपासून, राजधानी बीजिंगमध्ये, देशाच्या इतर भागातून विमान, ट्रेन किंवा कारने येणार्‍या सर्व लोकांना मागील 48 तासांत घेतलेल्या कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण 98,315 रुग्णांची आणि 4,636 मृत्यू नोंद झाली आहे.

हेही वाचा: चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'

loading image
go to top