Latest Marathi News | नाशिकची विमानसेवा 2 आठवड्यांसाठी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Airlines is closed for one week

Airline Department : नाशिकची विमानसेवा 2 आठवड्यांसाठी बंद

नाशिक : दिवाळीनंतर सुट्या, पर्यटनावरून परतणाऱ्यांची गर्दी वाढत असताना आणि नोव्हेंबर-डिसेंबर इअर एंडच्या सहलीसाठी नाशिकहून हवाईसेवेचे नियोजन केलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होणार आहे. साधारण दोन आठवडे नाशिकच्या ओझर येथील विमानसेवा बंद राहणार आहे.

दिवाळीनंतर साधारण डिसेंबरपर्यंत कर्मचारी सुट्या घेत प्रवासाचे नियोजन करतात. नेमक्या याच काळात ओझर विमानतळावरून विमानसेवा बंद राहणार आहे. नाशिकचे विमानतळ २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीने घेतला आहे.(Airline Department Airline services to Nashik closed for 2 weeks Nashik News)

हेही वाचा: Nashik : MPSC गट ‘क’ सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा शनिवारपासुन सुरू

ओझर विमानतळ लष्कराच्या एअर फोर्स, तसेच एचएएल यांच्या निगराणीखाली आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा सामरिकदृष्ट्या त्याचे महत्त्व असल्याने त्याची नियमित दुरुस्ती देखभाल काटेकोरपणे केली जाते.

नियमित वार्षिक देखभाल दुरुस्तीचा भाग म्हणून अशी कामे चालतात. यंदाही दोन आठवड्यांसाठी विमानतळावर दुरुस्तीचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे ते बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. सध्या ओझर विमानतळावरून दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा सुरू आहे, ती आता बंद राहणार आहे.

हेही वाचा: Nashik : मराठी Number plate असणाऱ्या वाहनांना दंड न करण्याची मागणी

टॅग्स :NashikOzarairlines