Latest Marathi News | MPSC गट ‘क’ सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा शनिवारपासुन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam Timetable

Nashik : MPSC गट ‘क’ सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा शनिवारपासुन सुरू

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा येत्‍या शनिवारी (ता. ५) होणार आहे. उमेदवारांना त्‍यांचे प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करण्यात आलेले आहेत. परीक्षा सुरू होण्याच्‍या वेळेच्‍या किमान दीड तास आधी केंद्रावर उपस्‍थित राहण्याच्‍या सूचना आयोगाने दिलेल्‍या आहेत.

एमपीएससीतर्फे गेल्‍या २९ जुलैला यासंदर्भात ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा शंभर गुणांसाठी आहे. या परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे.(MPSC Group C Service Joint Prelims Exam Starts From Saturday Nashik News)

हेही वाचा: Nashik : बाजारपेठेत दिवाळी Feverकायम; खरेदीसाठी महिलांची गर्दी

उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज प्रणालीतून प्राप्त करून घ्यायचे आहे. प्रवेश प्रमाणपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेला येताना सोबत आणणे अनिवार्य असेल. त्‍याशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नसल्‍याचे आयोगाने स्‍पष्ट केले आहे. निर्धारित अंतिम वेळेनंतर कुठल्‍याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

२२८ पदांच्‍या भरतीसाठी परीक्षा

या संयुक्‍त पूर्व परीक्षेतून २२८ पदांची भरती केली जाणार आहे. यात उद्योग संचालनालयातील उद्योग निरीक्षक (६ पदे), गृह विभागातील दुय्यम निरीक्षक (९ पदे), वित्त विभागातील कर सहायक (११४ पदे), सामान्‍य प्रशासन विभागातील लिपिक-टंकलेखक मराठी (८९ पदे), तर इंग्रजी (१० पदे) या पदांचा समावेश आहे.

हेही वाचा: Nashik : मराठी Number plate असणाऱ्या वाहनांना दंड न करण्याची मागणी