Latest Marathi News | मराठी Number plate असणाऱ्या वाहनांना दंड न करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indiranagar
Number plate fined for being from Marathi

Nashik : मराठी Number plate असणाऱ्या वाहनांना दंड न करण्याची मागणी

इंदिरानगर : वाहनांवरील नंबर प्लेट इंग्रजीत असावी, असे नियम असले तरीही किमान महाराष्ट्रात मराठीतून नंबर प्लेट असलेल्या वाहनांना त्यातून सूट मिळावी, अशी मागणी शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे माजी नगरसेविका संगीता जाधव आणि शिवसैनिकांनी केली आहे.

पाथर्डी फाटा चौकात रविवारी (ता. ३०) वाहतूक पोलिसांनी वासननगर भागात राहणाऱ्या प्रकाश पवार यांना त्यांच्या चारचाकीची नंबर प्लेट मराठीत असून, हे नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांना पाचशे रुपये दंड केला.(Demand not to penalize vehicles Marathi number plates Nashik News)

हेही वाचा: Nashik : बाजारपेठेत दिवाळी Feverकायम; खरेदीसाठी महिलांची गर्दी

स्थानिक पातळीवर सहसा मराठीतून नंबर प्लेट असली, तर पोलिस नियमबाह्य असले तरी दंड करत नाहीत. वैद्यकीय अभ्यासक्रमदेखील मराठीत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शिवाय दुकाने, हॉटेल, कंपनी आणि इतर आस्थापनावरील पाट्याही मराठीतून हव्यात, अशी सक्ती होत असताना, वाहनांवर मराठी पाटी असेल, तर त्यालाही सवलत मिळावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

मराठीतील नंबर प्लेट असलेल्या वाहनांना सूट मिळावी, यासाठी अधिकृत मागणी करणार असल्याचे शिवसेनेचे शैलेश कार्ले, बाळासाहेब काळे, दीपक पंडित आदींनी सांगितले.

हेही वाचा: Nashik Winter Weather Update : पारा 13.3 अंशांवर; हंगामातील नीचांकी