esakal | #COVID19 : चिंता करू नका..अत्यावश्‍यक वस्तू घरी "अशा' पोचतील 
sakal

बोलून बातमी शोधा

band.jpg

मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्‍यक वस्तूमाल व सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे सरसकट दुकाने बंद ठेवण्यास नाशिक शहरात सुरवात झालेली आहे. शहरभर शुकशुकाट पसरलेला आहे. बाजारपेठा बंद आहेत. नागरिकही घराबाहेर पडण्याचे टाळत आहे. अशा स्थितीत अत्यावश्‍यक वस्तूमालाची विद्यार्थी कार्यकर्त्यांमार्फत घरपोच सेवा केली जाणार आहे

#COVID19 : चिंता करू नका..अत्यावश्‍यक वस्तू घरी "अशा' पोचतील 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना अत्यावश्‍यक वस्तू मोफत घरी पोचविल्या जाणार आहेत. ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशन (एआयएसएफ)तर्फे सोमवार (ता. 23)पासून हा अभिनव उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

एआयएसएफतर्फे गरजूंसाठी अत्यावश्‍यक वस्तू घरी पोचवणार 

मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्‍यक वस्तूमाल व सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे सरसकट दुकाने बंद ठेवण्यास नाशिक शहरात सुरवात झालेली आहे. शहरभर शुकशुकाट पसरलेला आहे. बाजारपेठा बंद आहेत. नागरिकही घराबाहेर पडण्याचे टाळत आहे. अशा स्थितीत अत्यावश्‍यक वस्तूमालाची विद्यार्थी कार्यकर्त्यांमार्फत घरपोच सेवा केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांना प्राधान्य दिले जाईल. तसेच पोच मोफत राहाणार असून, वस्तूंचे पैसे घेतले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी 9421176485 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!