Nashik : आकांक्षाची कमी वयात वेटलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय झेप

Akansha Vyavhare
Akansha Vyavhareesakal

मनमाड (जि. नाशिक) : भुवनेश्वर (Bhuvaneshwar) येथे मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग (National Youth Weightlifting) स्पर्धेत सहा नवीन राष्ट्रीय विक्रमांसह (National records) सुवर्णपदक (Gold Medal) पटकविण्याचा पराक्रम करत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावणाऱ्या आकांक्षाची आता थेट मेक्सिको (Mexico) येथे होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग (World Youth Weightlifting) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अतिशय कमी वयात आंतरराष्ट्रीयस्तरावर जाणारी आकांक्षा पहिलीच खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे विनामोबदला अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची आकांक्षा ही पुतणी आहे. (Akansha vyavhare selected in World Youth Weightlifting in mexico Nashik Sports News)

लहानपणापासूनच थोडीशी लाजरी बुजरी असलेली आकांक्षा व्यवहारे हिने सातत्याने सराव आणि मेहनतीच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी मजल मारेल, असे कोणालाच वाटले नव्हते. सुरवातीला योगाचे प्रशिक्षण घेत शारीरिक व मानसिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच योगाच्या तालुका व जिल्हास्तरीय वयोगटांच्या स्पर्धेत सहभागी होत आकांक्षाने अनेक सुवर्णपदकांची कमाई केली, पण राज्यस्तरीय स्पर्धेतील यश मात्र अर्ध्या एक गुणांनी तिला हुलकावणी देत असे. परंतु निराश न होता वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी तिचा ११ व्या वर्षी या लहान वयातच वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला.

तिची शरीर रचना नाजूक, पण न चुकता दररोजच्या सरावामुळे काही महिन्यात तिच्यात चांगले बदल, अवघड अशा वेटलिफ्टिंग खेळाचे तंत्र आत्मसात केल्याने तिची प्रगती होत राहिली. त्याच काळात काही दानशूर पालकांनी लहान मुलांच्या व्यायामासाठी लागणाऱ्या फायबरच्या वेटलिफ्टिंग प्लेट्सचा खर्च उचलल्याने आकांक्षा व तिच्या बरोबर सराव करणाऱ्या अनेक लहान मुलांनी अतिशय उत्साहात वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान सांगली येथे एक १२ व १४ वर्षे वयोगटातील महाराष्ट्रातील व भारतातील पहिलीच राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा ७ ते १० सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या आपल्या पहिल्याच स्पर्धेत आकांक्षाने दोन्ही वयोगटांच्या स्पर्धेत ३० किलो वजनी सुवर्णपदक जिंकत वेटलिफ्टिंग खेळात दमदार सुरवात केली.

त्यानंतर कोरोनाचा हाहाकार उडाला सरावात बराच खंड पडला ऑगस्ट २०२१ मध्ये पंजाबच्या पतियाळा येथे बऱ्याच खंडानंतर राष्ट्रीय स्पर्धेचे भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे अतिशय कठीण अशा कोविडच्या नियमांचे पालन करत एकही प्रेक्षक किंवा खेळाडू स्पर्धेला उपस्थित राहणार नाही, असे काटेकोर नियोजन आणि पात्रता निकषही फारच ठेवल्याने खेळाडूंचा कस लागला. अतिशय भीतीयुक्त वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत आकांक्षाने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत नवीन उच्चांकी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले व भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी तिची निवड झाली. आतंरराष्ट्रीय स्पर्धा सिंगापूर येथे होणार होत्या, परंतु त्या दरम्यान पुन्हा कोविडचे प्रमाण वाढल्याने स्पर्धा रद्द झाल्या. भारतीय संघात निवड होण्याची तिची संधी हुकली. दरम्यान कोविड सदृश्य परिस्थितीतही घरीच व्यायामाचे धडे गिरवले मात्र वेटलिफ्टिंगचा सराव करण्यासाठी विशिष्ट साहित्य लागत असल्याने सरावात खंड पडला.

Akansha Vyavhare
जळगाव : ‘माझी वसुंधरा’ अभियानात शेंदुर्णी नगरपंचायत राज्यात दुसरी

परंतु डिसेंबर २०२१ मध्ये मलकापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा आकांक्षाने लक्षवेधक कामगिरी करीत ४० किलो युथ मुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले व स्पर्धेतील युथ मुलींचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमानही मिळवून भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात स्थान सरस कामगिरीच्या जोरावर पटकावले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये वेटलिफ्टिंगच्या खास प्रशिक्षणासाठी तिची निवड करण्यात आली. भारतातील २० सर्वोत्कृष्ट खेळांडूमध्येही आकांक्षाने स्थान पटकावले असून भुवनेश्वर येथे मार्च मध्ये झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ४० किलो वजनी गटामध्ये सहा नवीन राष्ट्रीय विक्रमांसह सुवर्णपदक पटकविण्याचा भीम पराक्रम केला. तसेच युथ मुलींच्या १० वजनी गटांमध्ये बेस्ट लिफ्टर म्हणजेच सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकाविला राष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत महाराष्ट्रातील मोजक्याच खेळाडूंना हा बहुमान मिळाला आहे.

Akansha Vyavhare
Jalgaon : तरुणीच्या बनावट खात्याद्वारे इंस्टाग्रामवर चॅटींग करत बदनामी

भुवनेश्वर येथे मिळविलेल्या सुवर्णपदकाच्या जोरावर आकांक्षाची मेक्सिको लिओन येथे होणाऱ्या जागतिक युथ स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली असून, सध्या ती पंजाबच्या पतियाळा येथे सराव करत आहे. लिओन मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आकांक्षाची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अतिशय कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी आकांक्षा पहिलीच खेळाडू ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com