Akshay Tritiya : शुभ मुहूर्तावर ‘सोनेरी’ झळाळी; दरात वाढ तरी खरेदीसाठी गर्दी!

Womens rush to buy gold
Womens rush to buy goldesakal

Akshay Tritiya : साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीया मुहूर्तावर सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची रेलचेल दिसून आली.

शेअर बाजारातील पडझड, बँकांचे ठेवीवरील घटलेले व्याजदर यामुळे सोन्याचे दर वधारलेले असले तरी सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. गतवर्षीपेक्षा यंदा प्रतितोळा सोन्याच्या दरात दहा हजारांनी वाढला असला तरी, ग्राहकांच्या गर्दीमुळे सराफी पेढ्यांना सोनेरी झळाळी आली. (Akshay Tritiya Golden lights on auspicious occasion pirce increase rush to buy gold investment nashik news)

देशभर अक्षयतृतीया सण उत्साहात साजरा होतो आहे. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयेला गृह, वाहन वा वस्तू खरेदीसाठी शुभ मानले जातात. तसेच, सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो.

त्यामुळे आजच्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. विशेषत: सराफ बाजारासह सराफी पेढ्यांवर ग्राहकांचा खरेदीसाठी उत्साह द्विगुणित करणार असल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले. शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड सुरू आहेत.

बँकांमध्ये ठेवी ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह राहिलेला नाही. त्यामुळे हमखास परताव्याची गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते.

तर, अक्षयतृतीया मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने ते ‘अक्षय’ राहते, असे मानले जाते. यामुळेच या मुहूर्तावर सराफ दुकानांमध्ये चोख सोने वा सोन्याच्या दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल आजच्या दिवशी दिसून आला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दर वाढले तरी...

गतवर्षी अक्षयतृतीयेला सोन्याचा प्रतितोळा सुमारे ४६ हजार रुपयांचा दर होता. या यंदा दहा हजारांची भर पडली. तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होते आहे. अक्षयतृतीया मुहूर्तावर सोन्याचे दर सुमारे ५६ हजार रुपये प्रतितोळा होता.

तरीही सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांची उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. विशेषत: चोख सोन्याकडे ग्राहकांचा कल असला तरीही, अक्षयतृतीया मुहूर्तावर सोने खरेदी अत्यंत शुभ मानले जात असल्याने किमान ५-१० हजारांपासून सोने खरेदी करणारे ग्राहकही सोन्याची खरेदी करताना दिसून आले.

"सोन्याचा प्रतितोळा दर वधारला असला तरी ग्राहक अक्षयतृतीया मुहूर्तावर सोन्याची खरेदी करतातच. सुबक आकारातील दागिने, डायमंड ज्वेलरी, चोख सोन्याचे वेढे याकडे ग्राहकांचा कल आहे. गतवर्षीपेक्षा यंदा सोने खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून आला आहे."

- स्वाती जाधव, व्यवस्थापक, पु.ना. गाडगीळ ॲन्ड सन्स, कॅनडा कॉर्नर.

Womens rush to buy gold
Akshay Tritiya 2023: सोने आणि चांदीमध्ये काय खरेदी करावे? तुम्हाला चांगला रिटर्न कुठे मिळू शकतो? जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com