
नाशिक /सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प आपल्या उर्वरित कार्यकाळात पूर्णत्वास नेणार असल्याची ग्वाही देतानाच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सुळे डावा कालवा, अप्पर पुनंद प्रकल्प यांच्यासाठी २०१८-१९ मध्ये पाणी आरक्षित करून घेतले असून, प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ही सर्व कामे २०२० पर्यंत पूर्ण होतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिकाऱ्यांसमवेत बैठक
डॉ. भामरे म्हणाले, की सर्व प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी १५ जूनला नाशिक येथे मुख्य अभियंता आनंद मोरे, उपमुख्य अभियंता एम. एस. आमले, उपमुख्य अभियंता एन. एम. माताडे, कार्यकारी अभियंता पाटील यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रकल्पांच्या कामाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. सुळे डावा कालवा हा लोहोणेर- ठेंगोड्यापर्यंत येऊन ठेंगोड्याच्या धरणात त्याचे पाणी सोडून पुढे पिंपळनेरमार्गे मुंजवाड येथे आरम नदीपात्रात हे पाणी सोडण्याची योजना आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून बंदिस्त पाइपलाइनद्वारे हे काम पूर्ण केले जाणार आहे.
कोरोनामुळे काम बंद
तळवाडे भामेर पोच कालव्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, मार्च २०२० पर्यंत तो पूर्ण होणार होता. मात्र कोरोनामुळे काम बंद पडले. कठगड बंधारा पूर्ण केला असून, किरकोळ दुरुस्त्या शेवटच्या किलोमीटरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केळझर डावा कालवा, केळझर चारी क्रमांक ८ या सिंचन प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता २०१८ मध्ये मिळवत त्यासाठी आठ कोटींचा निधीही खासदार निधीतून उपलब्ध करून घेतला आहे.
लवकरच टेंडर निघणार
० ते १२ किलोमीटरमध्ये १.८ डायमीटर असलेले सिमेंट पाइप टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे पुढील पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. केळझर चारी क्रमांक आठचे काम पूर्ण होत असून, कान्हेरी नदीवर पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. हरणबारी डाव्या कालव्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे काम करण्याचे इस्टिमेट डिझाइन मंजूर करून घेतले असून, लवकरच टेंडर निघणार आहे.
मापदंडात बदल करून कामासाठी निधी
हरणबारी उजवा कालवा १५ वर्षांपासून शासकीय मापदंडात बसत नसल्याने कालव्याचे काम बंद पडले होते. मात्र खासदार झाल्यानंतर या मापदंडात बदल करून कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. केळझर चारी क्रमांक ८ साठी १४.३५ एम सेफ्टी पाणी व हरणबारी उजवा कालव्या ३७.६६ एम सेफ्टी पाणी उपलब्ध करून घेतले, हरणबारी उजवा कालव्याचे पाणी पाटाने निताणेपासून वायगाव, सातमानेपर्यंत व केळझर चारी क्रमांक आठचे पाणी भाक्षीपासून अजमीर सौंदाणे, वायगावपर्यंत पोचण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.