esakal | व्हायरल लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; ठरलेलं लग्न मोडण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

love jihad

लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : प्रेमाला कशाचं बंधन नसतं, कसलीच अडवणूक नसते..इथे फक्त प्रश्न असतो तो दोन जीवांचा...अशाच प्रकारे दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर साथ निभावण्याची स्वप्न पाहिली...पण ती क्षणार्धात मोडली. कारण त्यांच्या लग्नाची 'ती' पत्रिका व्हायरल झाली अन् होत्याचं नव्हतं झालं. लव्ह जिहादच्या आरोपांमुळे ठरलेलं लग्न मोडण्याची वेळ या कुटुंबावर आल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. वाचा नेमके काय घडले? (Allegations-of-Love-Jihad-from-viral-wedding-invitation-marathi-news-jpd93)

लव्ह-जिहादचा आरोप

प्रेमाच्या नाते त्यानंतर विवाह करून एकमेकांसोबत राहण्याचे स्वप्न बघणारे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये बांधले जाणार होते. दोन कुटुंब आणि दोन वेगळ्या धर्मातील संस्कृती या लग्नाच्या माध्यमातून एकत्र येणार होत्या. मात्र या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली अन् क्षणार्धातच होत्याचं नव्हतं झालं. 28 वर्षीय मुलीचं लग्न मुस्लीम मुलासोबत हिंदू पद्धतीप्रमाणे होणार होतं. मात्र या मुलीच्या समाजातील लोकांनी आंदोलन करत या लग्नाला विरोध केला. हे लग्न म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा आरोप या समाजातील लोकांनी केला. समाजाच्या विरोधाला सामोरे जाताना कुटुंबाने लग्न समारंभ रद्द केला. मात्र मुलीची आवड आणि तिने मुस्लीम मुलासोबत लग्न करण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं तिच्या कुटुंबियांनी ठरवलं. मुलीच्या कुटुंबियांनी तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला नसल्याचं सांगत आधीच या दोघांचं कोर्ट मॅरेज झाल्याचं सांगितलं होतं. पण...

...म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला

मुलगी दिव्यांग असून नाशिकमधील प्रसिद्ध ज्वेलर्स हे या मुलीचे वडील आहेत. ते सांगतात, कि मुलीसाठी मुलगा शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र ती दिव्यांग असल्याने तिला स्वीकारणारा मुलगा सापडला नाही. दरम्यान मुलगी आणि तिचा वर्गमित्र असल्याने एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं आम्हाला सांगितलं. आमची कुटुंब एकमेकांना मागील काही वर्षांपासून ओळखत असल्याने आम्ही लग्नाला होकार दिला असल्याचे वडिलांनी सांगितले

हेही वाचा: शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य! लग्नगाठीही जुळल्या

मुलीच्या वडिलांना धमकीचे मेसेज व फोन

मे महिन्यामध्ये नाशिकमधील कोर्टामध्ये नोंदणी पद्धतीने या दोघांनी विवाह केला. त्यानंतर १८ जुलै रोजी रसिका सासरी जाण्याआधी हिंदू परंपरेनुसार लग्न करण्यालाही मुलाच्या घरच्यांनी परवानगी दिली. जवळच्या काही नातेवाईकांच्या परिस्थितीमध्ये नाशिकमधील हॉटेलमध्ये हा समारंभ पार पडणार होता. मात्र लग्नाची पत्रिका व्हॉट्सअपवरील अनेक ग्रुपवर व्हायरल झाली आणि आंदोलन करु, मेसेज, फोन कॉल करुन लोक आम्हाला त्रास देऊ लागले. अगदी अनोळखी लोकांनीही आम्हाला लग्न रद्द करण्यासाठी फोन केल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलं. ९ जुलैला मुलीच्या वडिलांना त्यांच्या समाजातील लोकांनी भेटीसाठी बोलवलं. या बैठकीदरम्यान समाजातील लोकांनी हा समारंभ करु नका असा सल्ला दिला. अखेर या धमक्या आणि इशारांमुळे लग्न समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: शिवाजी चुंभळेंना ‘ईडी’च्या नावाने धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

loading image