esakal | शिवाजी चुंभळेंना ‘ईडी’च्या नावाने धमकी; नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji chumbhale

शिवाजी चुंभळेंना ‘ईडी’च्या नावाने धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना ‘ईडी’च्या नावाने भ्रमणध्वनीवरून धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘ईडी’चे धाडसत्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये मोठमोठ्या राजकीय नेत्यांना नोटीस बजावणे, तसेच त्यांच्यावर कारवाई करणे आदी प्रकार सुरू आहेत. (Shivaji-Chumbhale-threatened-in-name-of-ED-marathi-news-jpd93)

नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमधील राजकीय वर्तुळातील मोठे नेतृत्व म्हणून ओळख असलेले बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना मंगळवारी (ता. १३) एका भ्रमणध्वनीवरून फोन आला. ईडी कार्यालयातून बोलतोय, आपल्या संदर्भात तक्रार आली आहे. अशा प्रकारची चौकशी करून धमकी आल्याची बाब उघडकीस आली. या वेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचेदेखील नाव घेण्यात आले. या संदर्भात चुंभळे परिवार लवकरच पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत असून, याबाबतचे खरेखोटे अद्याप समोर आलेले नाही. मात्र असे असले तरी याची शहानिशा होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

फेक अधिकाऱ्याची खबर

या वेळी हिंदी भाषिक असलेल्या त्या व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून चुंभळे यांची चौकशी करण्यास सुरवात केली. प्रश्नोत्तर सुरू केले. चुंभळे यांनी हिंदी- मराठी मिक्स भाषेत त्या ‘ईडी’च्या फेक अधिकाऱ्यांची चांगलीच खबर घेतली. एवढेच नव्हे तर त्याची पूर्ण जंत्रीच बाहेर काढली. अखेर वैतागून त्या फेक अधिकाऱ्याला नाइलाजास्तव फोन कट करण्याची नामुष्की पत्करावी लागली.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

हेही वाचा: लग्‍नातील 'त्‍या' व्‍हायरल व्‍हिडीओ मागे अशी होती अशी कहाणी!

loading image