Farmers Protest

Farmers Protest

sakal 

Ambasan Farmers Protest : बिबट्याची दहशत आणि महावितरणची दिरंगाई; अंबासनचे शेतकरी सोमवारपासून 'अन्नत्याग' उपोषणावर!

Farmers Demand Daytime Power Supply for Safety : अंबासन व परिसरात बिबट्याचा संचार सुरू असताना दिवसा वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांनी महावितरण आणि प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.
Published on

अंबासन: अंबासन, मोराणे सांडस, काकडगाव व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असताना प्रशासन व महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य शशिकांत कोर यांनी केला आहे. जीवावर उदार होऊन शेतकरी अंधारात शेतात जाण्यास भाग पडत असताना, दिवसा वीजपुरवठा सुरू न केल्यास सोमवार (ता. ९) पासून अन्नत्याग उपोषणास बसण्याचा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com