Nashik News: अंबासन ते मोराणे सांडस रस्त्याची चाळण; रस्त्यावरील भगदाड ठरतेय जीवघेणे

Ambasan to Morane sands road is in bad condition nashik news
Ambasan to Morane sands road is in bad condition nashik news

Nashik News : येथील अंबासन ते मोराणे सांडस रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली असून ब्रिटिश कालीन बंधा-याजवळील रस्त्याला पडलेली भगदड जीवघेणी ठरत आहे. तर काटेरी झुडपांच्या विळख्यात रस्ता सापडल्याने बससेवासह इतर वाहतूक बंद पडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसह प्रवाशांना खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत असल्याने अर्थिक भुर्दंडची झळ बसत आहे.

 ग्रामीण भागात विकासकामांना चालना देण्यासाठी गावाला जोडणारे रस्ते महत्वपूर्ण मानले जातात. मात्र मागील काही वर्षांपासून गावपातळीवरील जोडणारे गावरस्ते खड्ड्यांच्या विळख्यात सापडली आहेत. (Ambasan to Morane sands road is in bad condition nashik news)

रस्त्यावरील धोकादायक खड्डे तसेच काटेरी झुडपात हरपलेल्या रस्त्यांकडे संबधित विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी अंबासन येथील शेतीशिवारातील शेतकऱ्यांकडून अंबासन ते वाटोळी नाल्यावरील रस्त्यावर स्वखर्चाने मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. मात्र आज परिस्थिती 'जैसे थे' झाली असून या रस्त्यावरून खड्ड्यातून मार्गस्थ व्हावे लागत आहे. दरम्यान अंबासन ते मोराणे सांडस रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली असून ब्रिटिश कालीन बंधा-याजवळ रस्त्याला मोठी भगदाड पडली आहे.

यामुळे मालेगावहुन वळवाडे, अंबासन व मोराणे सांडस येणा-या बसेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

Ambasan to Morane sands road is in bad condition nashik news
Nashik News: सिन्नर शिर्डी महामार्गावरील पदपथाची दुरावस्था; अपघात होण्याची शक्यता

संबंधित विभागाकडून दखल घेऊन या रस्त्यावरील काटेरी झुडपे तसेच रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी अंबासन, मोराणे सांडस, बिजोरसे, वळवाडे, मळगावसह शेतीशिवारातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

"सदर रस्त्यावर आजुबाजुला काटेरी झुडूपामुळे येणारी जाणारी वाहणे दिसत नसल्यामुळे अपघात होत आहेत. रस्ता दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल सार्वजनिक बांधकाम विभाग ने घेतलली नाही. रस्ता दुरुस्ती केली नाही तर आंदोलन करण्यात येईल." -गंगाधर शेवाळे, उपसरपंच मोराणे सांडस.

"अंबासन, मोराणे रस्त्यावरील ब्रिटिश कालीन बंधा-याजवळ रस्त्याला मोठी भगदड पडली आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठी दुर्घटनेनंतर संबंधित विभाग दखल घेईल काय." -भाऊसाहेब भामरे, ग्रामपंचायत सदस्य अंबासन.

Ambasan to Morane sands road is in bad condition nashik news
Grapes Season: जानेवारीत मिळणार द्राक्षांचा गोडवा; निर्यातीचा टक्का वाढण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com